Nagpur Crime News | धावत्या रेल्वेच्या स्वच्छतागृहात चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न; कोच अटेंडन्सचे कृत्य, आरोपीला प्रवाशांची मारहाण

नागपूर : रेल्वेतील स्वच्छतागृहात शिरुन ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार (Minor Girl Rape Case) करण्याचा प्रयत्न झाला. ५० वर्षाच्या कोच अटेंडंटने (Railway Coach Attendant) हे कृत्य केले असल्याचे समजल्यावर प्रवाशांनी त्याला बेदम मारहाण केली. पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये मंगळवारी पहाटे ही घटना घडली. (Nagpur Crime News)

मोहम्मद मुन्ना (वय ५०, रा. गया, बिहार) असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या ८ वर्षांपासून रेल्वेत कोच अटेंडन्स म्हणून काम करतो. बंगलुरु -पाटणा पाटीलपुत्र एक्सप्रेसच्या (Bangalore-Patna Patilputra Express) ए सी थ्री टायरमधील बी २ कोचमध्ये त्याची ड्युटी होती. या कोचमध्ये एक ७५ वर्षाची ज्येष्ठ महिला आपल्या विवाहित मुलगी व ९ वर्षाच्या नातीसह प्रवास करत होती. ही गाडी नागपूरकडे येत असताना बुटीबोरी स्थानकाजवळ ही मुलगी बाथरुमला जाण्यासाठी उठली. त्यावेळी सर्व प्रवासी झोपले होते. मुलगी बाथरुममध्ये शिरताच मुन्ना दार ढकलून आत शिरला. त्याने दार लावून मुलीचे अंतवस्त्र काढण्याचा प्रयत्न केला.

घाबरलेली मुलगी रडू लागली. तरी तो तिच्याबरोबर चाळे करुन लागला. ती आरडाओरडा करु लागताच त्याने तिला पैशांचे आमिष दाखविले. तरी ती आरडाओरडा करु लागल्याने त्याने बाथरुमच्या दाराची कडी उघडली. हे पाहून मुलगी बाहेर पळाली. आपली मुलगी अजून का आली नाही, हे पाहण्यासाठी तिची आई उठून बाथरुमकडे जात असतानाच मुलगी धावत तिच्याकडे आली आणि तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यावर संतप्त झालेल्या आईने आरडाओरडा केला. प्रवाशांना ही बाब समजताच त्यांनी मुन्नाला बेदम मारहाण केली. काहींनी ही बाब रेल्वे सुरक्षा दलाला कळविली. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तातडीने डब्यात पोहचले. त्यांनी मुन्नाला ताब्यात घेऊन नागपूर लोहगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे शहरात चार ठिकाणी घरफोडीच्या घटना, सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास