Nagraj Manjule | नागराज मंजुळे यांचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला; करण्यात आले पोस्टर आऊट

पोलीसनामा ऑनलाइन – मनोरंजन विश्वातील महत्त्वपूर्ण दिग्दर्शकांमध्ये नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचे नाव आदराने घेतले जाते. नागराज मंजुळे हे नेहमी वास्तवदर्शी व समाजातील दुर्लक्षित प्रश्नांवर आधारित सिनेमे तयार करत असतात. नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांचा एक खास मोठा चाहता वर्ग आहे. आता नागराज मंजुळे यांचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस (Nagraj Manjule Upcoming Movie) येणार आहे. आधी त्यांच्या सैराट (Sairat), फॅन्ड्री (Fandry), नाळ (Naal) यासारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा ‘बापल्योक’ (Baplyok) हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे हे त्यांच्या हटक्या विषयांवरील चित्रपटांसाठी नावाजले जातात. अनेक नवोदित कलाकारांना त्यांनी संधी दिली असून त्यांचे करिअर उज्ज्वल केले आहे. त्याचप्रमाणे नागराज यांनी आता त्यांचा मित्र मकरंद शशिमधू माने (Makarand Sashimadhu Mane) यांच्या सोबत ‘बापल्योक’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच नागराज हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते देखील आहे. विजय शिंदे (Vijay Shinde), शशांक शेंडे (Shashank Shende) व मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘बापल्योक’ चित्रपटाची कथा विठ्ठल नागनाथ काळे (Vitthal Nagnath Kale) यांनी लिहिली आहे. बापल्योक हा चित्रपट येत्या 25 ऑगस्टला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित (Baplyok Release Date) होणार आहे.

सोशल मीडियावर नागराज मंजुळे यांची मोठी फॅन फॉलोविंग आहे. आटपाट प्रोडक्शनच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या सिनेमाचे पोस्टर आऊट करण्यात आले आहे. पोस्टर आऊट (Baplyok Poster Out) झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणे यामध्ये वडिल व मुलांच्या सुंदर नात्यावर हा चित्रपट प्रकाश टाकणार आहे. अनेकांनी कमेंट करत ‘बापल्योक’च्या सर्व टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी देखील ‘बापल्योक’
या चित्रपटाबाबत मत मांडले आहे. ते म्हणाले की,
“सरणारी वर्षं आणि वाढणारा सहवास यांच्या साथीने नाती मुरत जातात.
अर्थात या नात्यात सूर गवसला तर आयुष्याचा प्रवास सुफळ संपूर्ण होतो.
आजवर बाप लेकाचा प्रवास तेवढ्या ताकदीने चित्रपटातून मांडला गेला नाही.
मकरंद याला हा प्रवास मांडावासा वाटला.
मुख्य सहाय्यक दिग्दर्शक अमोल घरत (Amol Gharat) आहेत.
रंगभूषा संतोष डोंगरे (Santosh Dongre), कास्टिंग योगेश निकम (Yogesh Nikam) यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते शंतनू गंगणे (Shantanu Gangne) आहेत. लाईन प्रोडक्शनची जबाबदारी बहुरूपी प्रोडक्शन्सने (Bahurupi Production) सांभाळली आहे.”

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Congress | कॉंग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त
धार्मिक व सामाजिक ऐक्याचा संकल्प