Nagraj Manjule | नागराज मंजुळे आहेत दत्तक पुत्र, खरे नाव देखील आहे वेगळेच; मुलाखतीमध्ये सांगितले सत्य

पोलीसनामा ऑनलाइन – मराठी सिनेविश्वामध्ये आपल्या वैविध्यपूर्ण चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांची लोकप्रियता अफाट आहे. सैराट (Sairat), फॅंड्री (Fandry), नाळ (Naal) यांसारखे सुपरहिट चित्रपट देणारे नागराज यांनी त्यांच्या चित्रपटांमधून समाजाची वास्तविकता आणि अन्यायाला वाचा फोडली आहे. यामुळे त्यांचे चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत असतात. नागराज यांचा नवीन ‘बापल्योक’ हा चित्रपट (Baplyok Movie) देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने नागराज यांनी त्यांच्या खऱ्या नावाचा व ते दत्तक पुत्र असल्याचा खुलासा केला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्याबद्दल हे सत्य ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक असणारे नागराज मंजुळे हे आता प्रेक्षकांसाठी नवा कोरा चित्रपट घेऊन येणार आहे. त्यांचा ‘बापल्योक’ हा चित्रपट येत्या 25 ऑगस्टला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित (Baplyok Release Date) होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नागराज यांनी त्यांच्या खऱ्या नावाचा (Nagraj Manjule Real Name) खुलासा केला आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जास्त बोलताना दिसत नाहीत.

आता मात्र त्यांनी एका मुलाखतीमध्ये ते दत्तक पुत्र (Nagraj Manjule Adopted Son) असून त्यांचे खरे नाव वेगळे असल्याचे सांगितले आहे. नागराज म्हणाले की, “माझ्या वडिलांनी मला माझ्याच मोठ्या काकांना दत्तक दिले होते. त्याचं नाव बाबुराव आहे. काकाने मला दत्तक घेतल्यामुळे माझे कायदेशीर नाव ‘नागराज बाबुराव मंजुळे’ आहे. मी पूर्वी माझं नाव नागराज बाबुराव मंजुळे (Nagraj Baburao Manjule) असंच लिहायचो. एकदा मी एका नियतकालिकाला माझी कविता पाठवली. त्यात नुसतं नागराज मंजुळे असं लिहिलं तर माझ्या खऱ्या वडिलांना ते आवडलं नाही. त्यांनी मला ताकीद दिली की जे तुझे वडील आहेत त्यांचं नाव तू लिहिलंच पाहिजे. तू बाबुराव हे नाव काढू नकोस.”

ते पुढे म्हणाले की, “त्यावेळी त्यांनी मला असं सांगितलं याचं मला आश्चर्य वाटलं.
त्यांचं नाव टिकवावं यासाठी ते मला बाबुराव नाव लावायला सांगतायत असं मला वाटलं.
पण तेव्हापासून मी ‘नागराज बाबुराव मंजुळे’ असंच नाव लिहायचो.
पण मी आधीच ठरवलेलं की मी पुढे जाऊन जर मी काही मोठं केलं तर मी माझ्या बाबांचं म्हणजे पोपटराव मंजुळे यांचंच
नाव लावणार. अपघाताने मी सिनेसृष्टीत आलेलो आणि तेव्हापासून मी सगळीकडे ‘नागराज पोपटराव मंजुळे’ असंच
नाव लावतो.”

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Poptrao Manjule) यांनी त्यांच्या
वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलेल्या या गोष्टीमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला.
नागराज यांचा खेडापाड्यांसह शहरामध्ये देखील मोठा चाहता वर्ग आहे. त्यांचे (Nagraj Manjule) चित्रपट हे
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतात. लवकरच त्यांचा ‘बापल्योक’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
नावाप्रमाणेच या चित्रपटामध्ये वडील व मुलांच्या नात्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट असणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tejasswi Prakash And Karan Kundrra | तेजस्वी प्रकाशने सांगितले तिने का केले करण कुंद्रासोबतचे नाते सर्वांसमोर जाहीर; “मला ते करण्याशिवाय पर्याय…”