Nandurbar Police News | नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थ मुक्त घोषित! साडेसात हजार विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

अंमली पदार्थ मुक्त झालेला नंदुरबार राज्यातील पहिला जिल्हा

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar Police News | नंदुरबार जिल्हा अमली पदार्थ मुक्त (Drug Free) करण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने विशेष मोहीम सुरू केली होती. त्याला (Nandurbar) आता यश मिळाले असून जिल्हा आता अंमली पदार्थ मुक्त झाला असून त्याची घोषणा नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (Nashik Division Special IG) बी. जी. शेखर पाटील (B. G. Shekhar Patil) यांनी केली. अंमली पदार्थ मुक्त झालेला नंदुरबार हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. पोलीस अधीक्षक (Nandurbar Police News) कार्यालयाच्या मैदानावर शुक्रवारी (दि.18) झालेल्या कार्यक्रमात विविध शाळेच्या सुमारे साडे सात हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी अंमली पदार्थ मुक्त शपथ घेतली.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करुन झाली. प्रमुख पाहुणे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेकर पाटील यांचा सत्कार पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (Nandurbar SP P.R. Patil), तर पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांचा सत्कार अक्कलकुवा विभागचे उप विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे (Akkalkuwa Division SDPO Sadashiv Waghmare) यांनी केला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक चारुदत्त शिंदे (District Surgeon Charudatta Shinde), जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील (DyCEO Rajendra Patil), नंदुरबार वनविभागाचे उप वनरक्षक कृष्णा पवार (Krishna Pawar), जिल्हा कृषी अधीक्षक राकेश वाणी (Rakesh Vani) इत्यादींचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. (Nandurbar Police News)

कार्यक्रमाचे प्रास्तावीक करताना पोलीस अधीक्षक पी.आर पाटील म्हणाले, जगभरात गांजा, अफू, चरस यासारख्या अंमली पदार्थांची तस्करी (Drug Smuggling) व सेवन वाढल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यासंबंधी आळा घालण्यासाठी बैठका झाल्या. त्यानंतर 26 जुन हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून जगभरात साजरा करण्यास सुरुवात झाली. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे देशातील तरुणांमध्ये मानसिक आजाराची लक्षणे वाढू लागली व त्यांची कार्यक्षमता कमी झाली आहे. तसेच राज्य शासनाने यावर कडक कारवाई करण्यास सांगितले आहे.

मागील वर्षी अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये केलेल्या कारवाया पाहून विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थ मुक्त जिल्हा होऊ शकतो असे मत व्यक्त केले होते. त्या अनुषंगाने 1 मार्च 2023 पासून अंमली पदार्थ विरोधी अभियान सुरु करण्यात आले. जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने सोशल पोलिसिंग करून शाळा महाविद्यालयात जनजागृती केली. गावागावात जाऊन 634 ग्रामपंचायतीच्यावतीने ठराव करून जनजागृती केली.

ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत घेतलेल्या ठरावांच्या प्रति पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सुपूर्त केल्या. त्यानंतर पोलीस महानिरीक्षकांनी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त जिल्हा झाल्याची घोषणा केली. त्यानंतर हवेत अंमली पदार्थ मुक्त जिल्हा असा मजकूर लिहीलेले फुगे सोडून जिल्हा अंमली पदार्थ मुक्त झाल्याचा संदेश देण्यात आला.

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हटले, नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थ मुक्त झाल्याचा ऐतिहासिक क्षण आज साजरा होत आहे. आजची तरुण पिढी किंवा विद्यार्थी उद्याच्या भारताचे उज्ज्वल भविष्य आहे, देश घडविणारे आहेत. त्यामुळे कोणताही अंमली पदार्थ किंवा इतर प्रकारचे व्यसन न करता त्यांनी शिक्षणावर भर देवून भविष्यात प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी व्हावे. अंमली पदार्थामुळे देशाची तरुण पिढी कशी वाईट मार्गाला जावून त्यांचे भविष्य खराब करते किंवा वाईट कृत्य करतात हे त्यांनी उदाहणांमधून स्पष्ट करुन सांगितले.

यावेळी हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणारे नंदुरबार, शाहदा,
अक्कलकुव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी,
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, महिला सहायता कक्षातील सहायक पोलीस निरीक्षक
यांचा विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.

या दोन्ही कार्यक्रमावेळी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील,
अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे (Addl SP Nilesh Tambe), जिल्हा शल्य चिकित्सक चारुदत्त शिंदे,
जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील,
नंदुरबार वनविभागाचे उप वनरक्षक कृष्णा पवार, जिल्हा कृषी अधीक्षक राकेश वाणी,
नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन (Nandurbar Division SDPO Sanjay Mahajan), शहादा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार (Shahada Division SDPO Datta Pawar) ,
अक्कलकुवा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर (LCB PI Kiran Kumar Khedkar) यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार, ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, सरपंच, पोलीस पाटील उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Disqualification Case | आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय कधी होणार? विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची मोठी माहिती