हायकोर्टानं जात प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर नवनीत राणांनी दिली पहिली प्रतिक्रिया, शिवसेनेवर गंभीर आरोप करत म्हणाल्या…

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (member of parliament Navneet Rana) यांचं जात प्रमाणपत्र (Caste certificate) मुंबई हाय कोर्टानं रद्द केलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने खा. नवनीत राणा (navneet rana) यांना एक धक्का बसला आहे. याचबरोबर नवनीत राणा यांना कोर्टानं 2 लाखांचा दंड देखील सुनावला आहे. मुंबई हाय कोर्टाकडून मिळालेल्या या निकालामुळे खा. राणा यांचे खासदार पद धोक्यात आलं असल्याची चर्चा होत आहे. परंतु, कोर्टाच्या निर्णयावरून नवनीत राणा (navneet rana) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पीएम मोदींना राज्यपालांचा ‘तो’ विषय सांगितला

खासदार नवनीत राणा यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर पत्रकार परिषद घेतली.
त्यावेळी राणा म्हणाल्या, मुंबई हाय कोर्टाने आज दिलेला निर्णय अजून मी वाचलेला नाही.
परंतु, यामध्ये राजकारणाची खिचडी शिजली असल्याचा धक्कादायक आणि गंभीर आरोप नवनीत राणा यांनी शिवसेनेवर केला आहे.
तर अचानक उच्च न्यायालयाचा असा निर्णय येणं म्हणजे कुठेतरी राजकीय खिचडी शिजली हे नक्की अशा शब्दात खा. नवनीत राणा यांनी विरोधकांवर आरोप केले आहेत.
पुढे त्या म्हणाल्या, मागील 9 वर्ष झाली मी हा लढा लढत आहे.
यामध्ये कोणी पॉलिटिक्स केलं हे मला सांगण्याची आवश्यकता नाही.
परंतु, माझा आणि शिवसेनाचा हा वाद सर्वानाच माहिती आहे.
मात्र, न्यायालयाच्या या निर्णयानंतर न्याय मागण्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाणार आहे. मला न्यायावर विश्वास आहे, असं देखील खा. राणा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे.

पुढे, खा. नवनीत राणा म्हणाल्या, न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करते.
मला न्यायालयाचा आदेश अजून वाचायचा आहे. मागील 8 वर्ष यावरून आम्ही भांडत आहोत. महिलेला खूप परिश्रम करावे लागतात.
ते मी मागील काही 9 वर्षापासून केले आहेत. कोर्टाने मला 6 आठवड्यांचा अवधी दिला आहे. कुठल्या कारणामुळे जात प्रमाणपत्र रद्द केलं आहे.
त्यावर मी अभ्यास करेन. मला न्यायावर आणि माझ्या कामावर विश्वास असल्याचं नवनीत राणा म्हणाल्या.

काय आहे प्रकरण ?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदार संघातून शिवसेनेचे जेष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव झाला.
अपक्ष उमेदवार नवनीत राणा ह्या त्या मतदार संघातून विजयी झाल्या.
परंतु, आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी खा. नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका हाय कोर्टात दाखल केल्या होत्या.
खा. नवनीत राणा यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे.
त्यांनी जात प्रमाणपत्र समिती समोर देखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे, असा आरोप त्या याचिकेमध्ये करण्यात आला होता.

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत