NEMS School Pune | एनईएमएस शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न

पोलीसनामा ऑनलाइन – NEMS School Pune | ‘सारे जहाँ से अच्छा हिन्दोसिताँ हमारा, हम बुलबुलें हैं इसकी यह गुलसिताँ हमारा’ या समूह गीताने सोमवारी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा परिसर दणाणून सोडला. निमित्त होते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे. (NEMS School Pune)

शनिवार पेठेतील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी ‘सारे जहाँ से अच्छा हिन्दोसिताँ हमारा, हम बुलबुलें हैं इसकी यह गुलसिताँ हमारा’ या गीताने कार्यक्रमाची सुरूवात केली. त्यानंतर महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, झाशीची राणी यांची वेषभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित महान व्यक्तींच्या कार्याबद्दल माहिती दिली. भारत मातेच्या वेशभूषेतील विद्यार्थिनीने सर्वांचेच लक्ष वेधले. (NEMS School Pune)

त्यानंतर उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांच्या चमूने ‘इंडियावाले’ गीतावर समूह नृत्य सादर केले आणि उपस्थितांची दाद मिळविली. याशिवाय चार विद्यार्थिनींनी वैयक्तिक नृत्ये देखील सादर केली.

शाळेच्या माजी मुख्याध्यापिका दिपाली ठक्कर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
इयत्ता दुसरीच्या वर्ग शिक्षिका माधुरी दोषी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
कार्यक्रमाला इयत्ता पहिलीच्या संहिता मिस, तिसरीच्या सुवर्णा मिस, अश्विनी मिस,
श्रध्दा मिस आणि देवीदास सर देखील उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | भाजपची मनसेला युतीची ऑफर, राज ठाकरेंचे सूचक विधान; म्हणाले…

Pune Shivsena Thackeray Group | ‘मेट्रो स्टेशनच्या नावात बदल करावा, भूमिपुत्रांना नोकरी द्यावी, अन्यथा…’ शिवसेना ठाकरे गटाचा पुणे मेट्रोला इशारा

2nd “Sportsfield Monsoon League” Under 14 Boys Cricket | दुसरी ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा