New Platforms In Pune Railway Station | पुणे रेल्वे स्थानकात नव्याने 4 प्लॅटफॉर्म उभारले जाणार; वाढती गर्दी रोखण्यासाठी उपाययोजना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – New Platforms In Pune Railway Station | पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वाढती संख्या पाहता चार नवीन प्लॅटफॉर्म वाढवण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनकडून देण्यात आली आहे. हे प्लॅटफॉर्म मालधक्क्याच्या बाजूला असलेल्या रेल्वेच्या जागेत वाढवणार असल्याची माहिती आहे.

त्यासंदर्भातील कार्यवाही रेल्वे प्रशासनाने सुरु केलेली आहे. त्यामुळे आगामी काळात रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून हजारो प्रवाशांची ये-जा सुरु असते. त्यामुळे मालधक्क्याच्या बाजूला असलेल्या रेल्वेच्या जागेत प्लॅटफॉर्म वाढवण्याचे नियोजन आहे.

“पुणे रेल्वे स्थानकावरील वाढती गर्दी रोखण्याकरिता आणि प्रवाशांना वेळेत सुविधा पुरवण्यासाठी आम्ही विविध उपाययोजना करीत आहोत.
त्यात पुणे रेल्वे स्थानकावर चार अतिरिक्त प्लॅटफॉर्म वाढवण्यात येणार आहेत.
हे चार प्लॅटफॉर्म मालधक्क्याच्या मोकळ्या जागेत वाढवण्याचे नियोजन आहे.”, अशी माहिती इंदू दुबे (Indu Rani Dubey) , विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, पुणे विभाग यांनी दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sinhagad Road Pune Crime News | पुणे: सिंहगड रस्ता परिसरात आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Chandan Nagar Pune Crime News | पुणे: तुमच्यावर मनी लाँड्रींगची केस! चौकशीची भीती घालून सायबर गुन्हेगारांकडून महिलेला 13 लाखांचा गंडा

Sinhagad Express | मोटरमनने वेगमर्यादा न पाळल्याने सिंहगड एक्सप्रेस पकडताना प्रवाशाचा मृत्यू

Harshvardhan Patil On Sugar Export | साखर उत्पादनाचा अंदाज चुकल्यानेच केंद्राची निर्यातीवर बंदी; हर्षवर्धन पाटलांची कबुली