Nilesh Lanke On Gajanan Marne | गजानन मारणेच्या भेटीवर खासदार निलेश लंकेंचे स्पष्टीकरण; म्हणाले – ‘ ही भेट अचानक…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Nilesh Lanke On Gajanan Marne | खासदार निलेश लंके यांनी गुंड गजानन मारणे याच्याकडून सत्कार स्वीकारल्याने राजकीय वर्तुळात अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. गुंड गजा मारणे यांच्याविरोधात अनेक गुन्ह्याची नोंद असून त्यांच्याविरोधात अनेक खटले सुरु आहेत. यामध्ये अनेक गंभीर गुन्ह्याचा देखील समावेश आहे.

मागे त्याने अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) पार्थ पवार (Parth Ajit Pawar) यांची भेट घेतली होती, त्यावरुनही वाद निर्माण झाला होता. या भेटीबाबत बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, ” ही अपघाती भेट होती. दिल्लीची कामे आवरून मी काल एअरपोर्टला आलो. त्यानंतर एक पवार नावाचा आमचा एक सहकारी होता. त्याचं कॅन्सरच्या आजाराने निधन झालं. त्यामुळं मी त्यांच्या घरी गेलो होतो.

कुटुबियांची सांत्वनपर भेट झाली. त्यानंतर आमचा एक कार्यकर्ता आहे प्रवीण धनवे.
त्याच्या घरी जाताना काही चार ते सहा लोकांनी मला हात केला. त्यानंतर आम्ही थांबलो, त्यांनी आग्रह केला. आम्ही घरी गेलो.
चहा घेतला तेव्हा त्यांनी माझा सत्कार केला. तो पर्यंत मला त्या व्यक्तीची कोणती पार्श्वभूमी आहे याची मला माहिती नव्हती,
असं निलेश लंके म्हणाले. ही भेट अचानक घडली, नकळत चूक झाल्याची भावनाही खासदार निलेश लंके यांनी बोलून दाखवली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे फडणवीस का नव्हते? अजित पवार म्हणाले…

Indapur Pune News | देशात उंच घोड्यामध्ये नावलौकिक असलेल्या ‘सिंकदर’चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Excise Department Pune | पुणे : पोर्शे कार अपघातानंतर उत्पादन शुल्क विभागाला आली जाग, 68 हॉटेल व पबचे परवाने रद्द करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव