Nirmala Sitharaman On Rohith Vemula In Pune | पुण्यात रोहित वेमुला प्रकरणावरून निर्मला सीतारमण यांची काँग्रेसवर टीका, ”मोहब्बत की दुकान उघडणाऱ्या…”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Nirmala Sitharaman On Rohith Vemula In Pune | रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण ही एक अत्यंत दुर्दैवी घटना होती. हे प्रकरण विद्यापीठ पातळीवर अत्यंत संवेदनशीलतेने हाताळता आले असते. पण संपूर्ण देशभरात या प्रकरणाचे पडसाद उमटले. त्यामुळे सरकारविरोधात वातावरण तयार झाले. हा दबाव स्वार्थी गटांकडून तयार करण्यात आला होता. मोहब्बत की दुकान उघडणाऱ्या लोकांनी हा मुद्दा संसदेतही नेला, असे म्हणत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या प्रकरणावरून काँग्रेसवर टीका केली. त्या पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होत्या.

तेलंगणा पोलिसांनी रोहित वेमुला मृत्यू प्रकरणाची फाईल आता बंद केली आहे. तसेच सर्व आरोपींना क्लीन चीट दिली आहे. रोहित वेमुला हा दलित नव्हता, असेही पोलिसांनी म्हटले आहे. यावरून निर्मला सीतारमण यांनी ही टीका केली.

विरोधकांवर टीका करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या, हे प्रकरण चिघळवू नका असे मी म्हटले होते. हे प्रकरण सामंजस्याने विद्यापीठात हाताळता आले असते, पण विरोधकांनी देशभरात रस्त्या-रस्त्यावर आंदोलन केले. हे विद्यापीठ केंद्रीय असल्याने शिक्षणमंत्री आणि सरकारवर आरोप केले गेले. असहिष्णुता, राजकीय हस्तक्षेप आणि द्वेष हे सरकारमध्ये नसून स्वार्थी गटांमध्ये आहे. हे गट उच्च शिक्षणाच्या केंद्रांमध्ये हे विष पसरवण्याची संधी सोडत नाहीत.

काय आहे रोहित वेमुला प्रकरण…

दरम्यान, हैदराबाद विद्यापीठात पीएचडीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी रोहित वेमुला याने २०१६ साली आत्महत्या केली होती. या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती अशोककुमार रुपनवाल यांच्या एक सदस्यीय अध्यक्षतेखालील समितीकडे घडलेल्या घटनांच्या नोंदी ठेवण्याचे आणि या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

याप्रकरणी सिंकदराबादचे खासदार बंडारु दत्तात्रय, विधानपरिषदेचे आमदार एन. रामचंदर राव आणि हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. आता या सर्वांना क्लीन चीट देण्यात आली आहे.

पोलिसांनी हे प्रकरण बंद करण्याबाबत उच्च न्यायालयात अहवाल दिल असून त्यामध्ये म्हटले की, रोहित वेमुला दलित नव्हता. रोहित वेमुला दलित असल्यामुळेच त्याची हत्या झाली असा आरोप केला जात होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Ajit Pawar | अजित पवारांना रोहित पवारांचे थेट आव्हान, ”अजितदादा तुमच्यात जर धाडस असेल तर किरीट सोमय्यांना…”