“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament | पहिली ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद १९ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धा; ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघाचा सलग दुसरा विजय; त्रिनिटी क्रिकेट अ‍ॅकॅडमीची विजयी कामगिरी !!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – “Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament | क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित पहिल्या ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद १९ वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धेत ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघाने सलग दुसरा तर, त्रिनिटी क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयाचे खाते उघडले. (“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament)

कटारीया हायस्कूल मैदान, मुकूंदनगर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत सुदर्शन कुंभार याच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्रिनिटी क्रिकेट अ‍ॅकॅडमीने आर्यन्स् अ‍ॅकॅडमीचा ६१ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना त्रिनिटी क्रिकेट अ‍ॅकॅडमीने ११८ धावा धावफलकावर लावल्या. महेश एस. (२५ धावा) आणि सुदर्शन कुंभार (१७ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. या लक्ष्यासमोर आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव ५७ धावांवर गडगडला. सुदर्शन कुंभार याने १० धावात ६ गडी बाद करून आर्यन्स्चा डाव मोडून काढला.

राहूल वाजंत्री याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने सीएसआर क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा २२
धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने १२६ धावांचे आव्हान उभे केले.
विराज आवलेकर याने नाबाद ३७ धावा तर, रौनक दुबे याने ४२ धावांची खेळी केली. सीएसआर क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १६.५ षटकामध्ये १०४ धावांवर संपुष्टात आला. अरमान खान याने ३७ धावांची खेळी केली. राहूल वाजंत्री याने १७ धावात ४ गडी बाद केले. प्रज्वल जाधवर आणि आदित्य लोखंडे यांनीही प्रत्येकी २ गडी बाद करून संघाचा विजय सोपा केला. (“Nock-99 Cup” Under 19 T-20 Tournament)

सामन्याचा संक्षिप्त धावफलकः गटसाखळी फेरीः
त्रिनिटी क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १५ षटकात ४ गडी बाद ११८ धावा (महेश एस. २५, सुदर्शन कुंभार १७, ज्ञानल ठिगळे २-२४)
वि.वि. आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ११.१ षटकात १० गडी बाद ५७ धावा (रोहन पारेख १७, ज्ञानल ठिगळे ११,
सुदर्शन कुंभार ६-१०); सामनावीरः सुदर्शन कुंभार;

ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीः १७ षटकात ८ गडी बाद १२६ धावा (विराज आवलेकर नाबाद ३७, रौनक दुबे ४२,
धनंजय पावडे २३, यतिराज पाटोळे ४-२७) वि.वि. सीएसआर क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १६.५ षटकात १० गडी बाद १०४ धावा
(अरमान खान ३७, प्रतिक होडागे १८, राहूल वाजंत्री ४-१७, प्रज्वल जाधवर २-१६, आदित्य लोखंडे २-१९);
सामनावीरः राहूल वाजंत्री.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Thackeray Group On CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे हे स्वतः हमास, उद्धव ठाकरे गटाने दसरा मेळाव्यातील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

BJP Ashish Shelar On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची टीका भाजपा नेत्यांच्या जिव्हारी, शेलार म्हणाले – ‘आता काँग्रेसी हृदयसम्राट बालिशसाहेबांचे…’