Palghar ACB Trap | एक लाखाची लाच घेताना उपकार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळयात

पालघर : Palghar ACB Trap | विविध कामांचे बिल मंजूर करण्याकरीता बिलावर सही करुन केवळ वरिष्ठ कार्यालयात पाठविण्याकरीता तब्बल १ लाख रुपयांची लाच (Bribe) घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) महावितरणच्या उपकार्यकारी अभियंताला (MSEB Deputy Executive Engineer) रंगेहाथ पकडले. (Palghar ACB Trap)

ज्ञानेश्वर रघुनाथ वट्टमवार (Dnyaneshwar Raghunath Vattamwar) असे या उपकार्यकारी अभियंताचे नाव आहे.

याप्रकरणी एका ५६ वर्षाच्या ठेकेदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी महावितरणच्या वाडाअंतर्गत केलेल्या विविध कामांचे बिल सादर केले होते. या बिलावर सही करुन ते वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी उपकार्यकारी अभियंता वट्टमवार याने १ लाख रुपयांची लाच मागितली. याची तक्रार पालघर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Palghar ACB Trap) आली. त्याची पडताळणी केली असता वट्टमवार याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले (Superintendent of Police Punjabrao Ugale), अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Additional Superintendent of Police Anil Gherdikar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप (Deputy Superintendent of Police Navnath Jagtap), पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास (Police Inspector Swapan Biswas), हवालदार संजय सुतार (Sanjay Sutar), विलास भोये, निशा मांजरेकर, अमित चव्हाण, नवनाथ भगत, सखाराम दोडे यांनी महावितरणच्या वाडा कार्यालयात सापळा रचला. मंगळवारी रात्री तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच घेताना वट्टमवार याला पकडण्यात आले.

Web Title :- Palghar ACB Trap | Deputy Executive Engineer caught in ACB’s net while taking bribe of Rs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा