रामदेव बाबांकडून आता पतंजलीचे मोबाईल ‘सिम’कार्ड

वृत्तसंस्था

बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’या कंपनीची बरीच उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. आयुर्वेदिक आणि स्वदेशी असे उपयुक्त मूल्य असलेल्या ‘पतंजली’ने मार्केटमध्ये आपला एक वेगळाच ग्राहक वर्ग निर्माण केला आहे. आता ‘पतंजली’ने मोबाईल सिमकार्ड देखील बाजारात आणले आहे. ‘पतंजली’ने बीएसएनएल सोबत मिळून हे सिम कार्ड लॉंच केले आहे. मात्र सध्यातरी हे पतंजली सिमकार्ड फक्त पतंजलीच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात येणार आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पतंजली आणि बीएसएनएल यांनी मिळून हे स्वदेशी समृद्धि सिम कार्ड बनवले आहे. या सिमकार्ड द्वारे ‘पतंजली’च्या उत्पादनावर १० टक्के सूट देखील मिळणार आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी आता टेलिकॉम सेक्टर मध्ये देखील उडी मारली आहे. रविवारी एका कार्यक्रमादरम्यान हे सीम कार्ड लाॅंच केले. सध्यातरी हे सीम कार्ड फक्त ‘पतंजली’च्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. या सीमकार्डला ‘स्वदेशी समृद्धि सिम कार्ड’ असे नाव देण्यात आले आहे. यात १४४ रुपयांचा रिचार्ज केल्यास युजर ला २जी बी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे.

काय आहेत सीमचे फायदे

  • यात १४४ रुपयांचा रिचार्ज केल्यास युजर ला २जी बी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे.
  • 2GB डाटा आणि 100 एसएमएस
  • पतंजलीच्या उत्पादनावर १० टक्के सूट
  • युजरला २.५ लाख रुपयांचा मेडिकल इन्शुरन्स
  • पाच लाखापर्यंत लाइफ इन्शुरन्स

वरिल सर्व सुविधा देण्यात येणार असल्याचे रामदेव बाबा यांनी कार्यक्रमा दरम्यान सांगितले. सध्या हे सीम फक्त कर्मचाऱ्यांसाठी आहे. पण जेव्हा ही सर्वांकरिता सुविधा सुरु करण्यात येईल तेव्हा वरील सर्व सुविधांचा समावेश त्यामध्ये असणार आहे. यावेळी बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, बीएसएनएल स्वदेशी नेटवर्क आहे. याद्वारे बीएसएनएल आणि पतंजलीचा देशाची सेवा करण्याचा हेतू आहे. आमचे नेटवर्क फक्त स्वस्तच नाही तर कॉलिंगचे देखील चांगले पॅकेज देते आहे. याबरोबरच हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स देखील देत आहे. हे इन्शुरन्स फक्त रॉड अपघातांकारीत असतील असे रामदेव बाबांनी स्पष्ट केले. या भरमसाठ सुविधा देणाऱ्या सीमकार्ड चे सर्वसामान्यांना केव्हा उपलब्ध होतील याची वाट पाहावी लागेल