Pension Slip | पेंशनधारकांना मोठा दिलासा ! आता WhatsApp च्याद्वारे सुद्धा मिळू शकते पेन्शन स्लिप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जर तुम्ही केंद्र सरकारचे पेन्शनर्स (Pensioner) असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. कारण, केंद्र सरकारने पेन्शन (Pension Slip) जारी करणार्‍या बँकांना सांगितले आहे की, बँक अकाऊंटमध्ये रक्कम आल्यानंतर त्यांनी एसएमएस आणि ईमेलसह व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सारख्या मीडिया अ‍ॅपचा सुद्धा वापर करून पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन स्लिप (Pension Slip) पाठवावी. एका अधिकृत आदेशात हे सांगण्यात आले आहे.

आदेशानुसार पेन्शनधारकांच्या सुविधेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पेन्शन आणि पेन्शन कल्याण विभागाकडून (Department of Pension and Pensioners’ Welfare) जारी आदेशात म्हटले आहे की, बँका, एसएमएस आणि ईमेलसह व्हॉट्सअप इत्यादी सोशल मीडिया अ‍ॅपचा सुद्धा वापर करू शकतात.

मागील महिन्यात पेन्शन देणार्‍या बँकांची केंद्रीय पेन्शन वितरण केंद्रे म्हणजे सीपीपीसी (Central Pension Processing Centres) ची एक बैठक झाली.
ज्यामध्ये पेन्शन धारकांच्या मासिक पेन्शनवर चर्चा झाली.
आदेशानुसार, बँकांना हे कल्याणकारी पाऊल उचलण्यास सांगण्यात आले, जे बँकांनी स्वीकारले आहे.

Web Title : Pension Slip | pensioners may now get pension slip from banks through whatsapp also

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune News | पुण्यातील ‘त्या’ 12 श्वानांच्या मालकांना कोर्टाचा दणका, मनेका गांधींनी उघडकीस आणला होता क्रुरतेचा प्रकार

pune corporation | 23 गावांच्या विकास आराखड्याचा वाद ! विशेष सर्वसाधारण सभेत भाजपने आराखड्याचा इरादा जाहिर करण्याचा प्रस्ताव केला बहुमताने मंजूर

PM-Kisan | पती-पत्नी दोघेही पीएम किसानचा लाभ घेऊ शकतात का? जाणून घ्या तुमच्या प्रश्नाची उत्तरे

Israeli Technology | कोरोना झालाय की नाही, समजणार फक्त 15 सेकंदात, 15 ऑगस्टपासून भारतात ‘हे’ नवं टेक्निक येणार