×
Homeताज्या बातम्याPetrol Price in Parbhani । इंधनाचा भडका सुरूच ! परभणीत पेट्रोल 105...

Petrol Price in Parbhani । इंधनाचा भडका सुरूच ! परभणीत पेट्रोल 105 रुपये पार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Petrol Price in Parbhani ! मागील काही दिवसापासून पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-diesel prices) दरात प्रचंड वाढ दिसून येत आहे. आज काहीसा दरवाढीला दिलासा मिळाला आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या किमतीत (Petrol-diesel prices) कुठलाही बदल झालेला नाही. इंधनाच्या रोज वाढत्या किमतीला विराम मिळाला आहे. दरम्यान असे असले तरी देशातील अनेक जिल्ह्यात, शहरात पेट्रोलच्या किंमती (Petrol-diesel prices) प्रति लीटर (Per liter) प्रमाणे 105 रुपये इतके आहे. तर परभणीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लीटर प्रमाणे 105 रुपये पार केला गेला आहे. petrol price in Parbhani | on 17th june petrol and diesel price today not changed petrol price in parabhani is 105 rs per litre

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) बुधवारी (16 जून) कच्च्या तेलाच्या दरात काही प्रमाणात घट झाली आहे.
ज्यामुळे आज इंधनाच्या दरात देखील वाढ झाली नाही.
मागील दीड महिन्यापासून सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-diesel prices) दरात वाढ होत आहे.
दरम्यान, मे महिन्यापासून वारंवार इंधनाचे दर वाढत असल्यामुळे मागील 26 दिवसात पेट्रोलचे दर 6.34 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर या 26 दिवसात 6.63 रुपये प्रति लीटरने वाढले आहेत.
महाराष्ट्रातील परभणी (Parbhani) शहरात इंधनाचे दर (Petrol Price in Parbhani) सर्वाधिक असतात.
आज पेट्रोलचे दर प्रति लीटर प्रमाणे 105.16 रुपये तर डिझेल 95.63 रुपये आहे.

आज होणार महत्त्वाची बैठक –

पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-diesel prices) वाढत्या किंमतीबाबत संसदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज होणार आहे.
पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस प्रकरणांसंदर्भात ही बैठक होणार आहे.
समितीने पेट्रोलियम मंत्रालय आणि IOC, BPCL आणि HPCL च्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलविले आहे. यामध्ये सध्याच्या किंमती तसेच मार्केटिंग बाबत चर्चा चर्चा करण्यात येणार आहे.
नॅचरल गॅसच्या (Natural gas) सध्याच्या प्राइसिंग-मार्केटिंग (Pricing-Marketing) विषयावरही माहिती घेतली जाणार आहे.
याव्यतिरिक्त या बैठकीत GAIL च्या अधिकाऱ्यांना सुद्धा बोलवलं आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-diesel prices) रोज सकाळी 6 वाजता बदलत असतात.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.
परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाचे दर काय आहेत, यानुसार दररोज पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-diesel prices) किंमतीत बदल होत असतो.

पेट्रोल-डिझेलच्याआजच्या (17 जून) किंमती – (प्रति लीटर प्रमाणे)

– परभणी : पेट्रोल – 105.16 रुपये आणि डिझेल – 95.63 रुपये

– दिल्ली : पेट्रोल – 96.66 रुपये आणि डिझेल – 87.41 रुपये.

– मुंबई : पेट्रोल – 102.85 रुपये आणि डिझेल – 94.84 रुपये

– चेन्नई : पेट्रोल – 97.91 रुपये आणि डिझेल – 92.04 रुपये

– श्रीगंगानगर : पेट्रोल – 107.79 रुपये आणि डिझेल – 100.51 रुपये.

– कोलकाता : पेट्रोल – 96.58 रुपये आणि डिझेल – 90.25 रुपये

– रीवा : पेट्रोल – 107.07 रुपये आणि डिझेल 98.10 रुपये

– हैदराबाद : पेट्रोल – 100.46 रुपये आणि डिझेल – 95.28 रुपये

– जयपूर : पेट्रोल – 103.29 रुपये आणि डिझेल – 96.38 रुपये

– भोपाळ : पेट्रोल – 104.85 रुपये आणि डिझेल – 96.05 रुपये

कसं तपासाल इंधनाच्या किंमती –

पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-diesel prices) तुम्ही SMS द्वारे मिळवू शकता.
याबरोबरच भारतातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-diesel prices) नव्या किंमती जाहीर करत असतात.
नव्या किमतीसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती जाणून घेऊ शकता.
तसेच, आपण मोबाइलवर SMS च्या माध्यमातून किमती जाणून घेऊ शकता.
तुम्ही – 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल- डिझेलच्या (Petrol-diesel prices) दराबाबत देखील जाणून घेऊ शकता.
दरम्यान, इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP <स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर सेंड करावा लागणार आहे.
विविध शहराचा एक वेगवेगळा कोड असतो. IOCLच्या वेबसाइटवर नागरिकांना हा कोड मिळणार आहे.

 

Web Title : petrol price in Parbhani | on 17th june petrol and diesel price today not changed petrol price in parabhani is 105 rs per litre

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

SBI SCO Recruitment 2021 । सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! SBI मध्ये परीक्षेशिवाय थेट मुलाखतीद्वारे भरती

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News