महाविद्यलयीन प्राध्यापकांसाठी पीएचडी बंधनकारक

नवी दिल्ली :वृत्तसंस्था

महाविद्यालयातील प्राध्यपकांच्या पदोन्नती बाबतीत आता एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पदोन्नतीसाठी पीएचडीची सक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका टीव्ही वाहिनीशी बोलताना दिली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , आतापर्यंत महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक होण्यासाठी पदवी परीक्षेसह नेट, सेट किंवा पीएचडी करणे बंधनकारक होते.आता या नियमात बदल करण्यात आला असून पीएचडी बंधनकारक करण्यात आली आहे. आता महाविद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी फक्त नेट सेट नव्हे तर पीएचडी होणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या नियमाची अंमलबजावणी २०२१ पासून होणार आहे.

महाविद्यालयीन शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ही नवी नियमावली जारी करण्यात आल्याचे प्रकाश जावडेकरांनी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटले आहे. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांना पदोन्नतीसाठीही पीएचडी बंधनकारक असेल. विद्यापीठांतील नव्या नियुक्त्या पीएचडीधारकांनाच दिल्या जाणार आहेत. ज्या प्राध्यापकांकडे सध्या पीएचडी नाही, त्यांना तीन वर्षांचा वेळही देण्यात आला आहे. 2021 पर्यंत असिस्टंट प्रोफेसर असलेल्या सर्व प्राध्यापकांना पीएचडी मिळवणं बंधनकारक आहे.

दरम्यान, ज्या भारतीय विद्यार्थ्यांनी देशाबाहेरील 500 सर्वोत्तम विद्यापीठांतून पीएचडी मिळवली आहे. ते विद्यार्थी भारतातील कोणत्याही महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी पात्र असतील.