PI Kirankumar Bakale | गुन्हे शाखेतील फरार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकालेंनी पत्कारली शरणागती

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Jalgaon Crime News | जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व निलंबित पोलीस अधिकारी किरणकुमार बकाले यांनी दीड वर्षानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शरणागती पत्कारली आहे. मागील दीड वर्षापासून बकाले स्थानिक गुन्हे शाखा व जळगाव पोलिसांना चकवा देत होते. अखेर बकाले यांनी स्वत:हून शरणागती पत्कारली आहे.

निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. ते विधान मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याची दखल घेऊन मराठा समाजाने आंदोलन करुन बकाले यांच्या अटकेची मागणी केली होती. दरम्यान, बकाले यांच्यावर जिल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर बकाले दीड वर्ष फरार होते. दरम्यानच्या काळात त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांना अटकपूर्व जामीन मिळवण्यात यश आले नाही. अखेर बकाले यांनी सोमवारी (दि.15) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शरणागती पत्कारली. मराठा समाजावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांना नाशिक येथे हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र ते दीड वर्ष पोलिसांना गुंगारा देत होते.

दोन दिवसांची पोलीस कोठडी

आज (15 जानेवारी) रोजी सकाळी बकाले पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण आले. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी नागरिकांनी न्यायालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परंतु कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना न्यायाधीश जे.एस. केळकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या समक्ष हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीशांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर बकाले यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खुन प्रकरणात विठ्ठल शेलार व वाघ्या उर्फ रामदास मारणेला अटक

Kondhwa Khadi Machine Chowk | कोंढवा खडी मशीन चौक ते मंतरवाडी रस्ता 50 मी.चाच करणार

शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याने चैन स्नॅचिंग, पर्वती पोलिसांकडून आरोपीला अटक; सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त