Pimpri Chinchwad Accident Case | पिंपरी : भरधाव कारने श्वानांना चिरडले, एकाचा मृत्यू तर 2 जखमी; तरुणावर गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Accident Case | पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर (Porsche Car Accident Pune ) वेगवेगळ्या अपघातांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोसायटीमधून कार बाहेर घेऊन जाताना श्वानांना चिरडल्याचा व्हिडीओ पोलिसांना मिळाल्यानंतर मारुंजी येथील एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. वन्यजीव प्रेमी नागरिकांमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मुळशी तालुक्यातील लाइफ रिपब्लिक, कोलते पाटील नगर मारुंजी येथे सोमवारी (दि.10) रात्री पावणे बाराच्या सुमारास घडली आहे.

राणाप्रताप रामदास भट्टाचार्य (वय 34, रा. लाईफ रिपब्लिक, कोलते पाटील, मारुंजी) यांनी या प्रकरणी गुरुवारी (दि.13) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शंतनु जयसिंग करांडे (वय 27, रा. लाईफ रिपब्लिक, कोलते पाटील, मारुंजी) याच्याविरोधात आयपीसी 429, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोसायटीतून कार बाहेर घेऊन जात असताना रस्त्यावर श्वानांचा एक घोळका बसला होता.
आरोपीने हयगयीने भरधाव वेगात कार चालवत श्वानांच्या अंगावर घातली.
या अपघातात दोन श्वान गंभीर जखमी झाले तर, एका श्वानाचा मृत्यू झाला.
याप्रकाराची माहिती मिळताच सोसायटीतील नागरिक आणि काही प्राणी प्रेमी नागरिकांनी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार केली.
नागरिकांनी आरोपीने कशा प्रकारे कार सोसायटी बाहेर काढली, कशी श्वानांच्या अंगावर घातली, याचा व्हिडीओ
पोलिसांना दिला आहे. यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपीने कार श्वानांच्या अंगावर घातल्यानंतर काही नागरिकांनी पाहिले. त्यांनी आरोपीला कारच्या बाहेर घेत
चोप दिल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांनी मारहाण केल्याचा तक्रार अर्ज आरोपीने केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे फडणवीस का नव्हते? अजित पवार म्हणाले…

Indapur Pune News | देशात उंच घोड्यामध्ये नावलौकिक असलेल्या ‘सिंकदर’चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Excise Department Pune | पुणे : पोर्शे कार अपघातानंतर उत्पादन शुल्क विभागाला आली जाग, 68 हॉटेल व पबचे परवाने रद्द करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव