Pimpri Chinchwad Cheating Case | पिंपरी : 85 हजार रुपयात आयफोन-15 प्रो मॅक्स देण्याच्या बहाण्याने मोबाईल शॉपी धारकाची फसवणूक, एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Cheating Case | नवीन आयफोन-15 प्रो मॅक्स हा मोबाईल 85 हजार रुपयात देण्याचे आमिष दाखवून एका मोबाईल शॉपी धारकाची 70 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी (Nagdi Police Station) एकला अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.11) दुपारी बारा ते पावणे दोन वाजण्याच्या सुमारास आकुर्डी परिसरातील (Akurdi) तुळजाई क्लासीक, सुंदर मार्केटींग येथील सार्वजनिक ठिकाणी घडला आहे.

पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन गणेश अशोक भालेराव (वय-29 रा. झेन इस्टेट खराडी, पुणे) याला अटक केली आहे. याबाबत आनंद नामदेव आसवाणी (वय-32 रा. पर्वती निवास, पिंपरी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने फोन करून मंयक शर्मा बोलत असल्याचे सांगितले. त्याने नवीन आयफोन 15 प्रो मॅक्स हा मोबाईल 85 हजार रुपयात देतो असे सांगून विश्वास संपादन केला. तसेच फिर्यादीच्या मोबाईल शॉपीमधूम सॅमसंग एस 24 अल्ट्रा फोन घेणार आहे. त्यामुळे 15 हजार रुपये तुमच्याकडेच अॅडव्हान्स म्हणून ठेवा आणि 70 हजार रुपये द्या असे सांगितले.

यानंतर आरोपीने आकुर्डी मेनरोड वरील रणजीत सरदार यांच्या सुंदर मार्केटींग येथून फोन ताब्यात घेण्यास सांगितले.
फिर्य़ादी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी आरोपी मयंक शर्मा याने पाठवलेल्या युपीआय आयडीवर 70 हजार रुपये पाठवण्यास सांगितले.
त्यानुसार फिर्यादी यांनी पैसे पाठवले. मात्र, फिर्यादी यांना मोबाईल फोन मिळाला नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्य़ादी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध घेऊन अटक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | पुणे : लाच मागणाऱ्या थेऊरच्या महिला मंडल अधिकाऱ्यासह तीन जण अ‍ॅन्टीकरप्शनच्या जाळ्यात

Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : तडीपार गुन्हेगाराला साथीदारांसह अटक, पिस्टल, काडतुस जप्त; घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस (Video)

Merged Villages In PMC | पुणे महानगरपालिकेत नव्याने सामाविष्ट 34 गावांचा वाढीव तीनपट ते दहापट मिळकतकर कमी करण्याची कार्यवाही तात्काळ करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंत्रालयात आयोजित बैठकीत निर्देश

Congress leader Padmakar Valvi joins BJP | काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश ! काँग्रेसला अनेक मोठे धक्के बसणार; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे