Pimpri Chinchwad Crime Branch Raid On Spa Center | पिंपरी : हिंजवडीत स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायावर छापा, चार महिलांची सुटका, एकाला अटक (Video)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन- Pimpri Chinchwad Crime Branch Raid On Spa Center | स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitution Racket Busted) गुन्हे शाखेच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाने (Pimpri Chinchwad UBT) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी छापा मारून एकाला अटक केली आहे. तसेच महाराष्ट्रातील तीन आणि पश्चिम बंगाल मधील एक अशा एकूण चार महिलांची सुटका केली आहे. पोलिसांनी ही करवाई बुधवारी (दि. 1) रात्री साडेआठच्या सुमारास भूमकर चौकातील (Bhumkar Chowk) द वेदा स्पा (The Veda Spa) या ठिकाणी केली.

स्पा मॅनेजर ऋषिकेश मुकेश निकाळजे (वय 24 सध्या रा. सत्कार परांडे यांच्या बिल्डिंगमध्ये, दुसरा मजला, शनी मंदिराजवळ, किवळे गाव, पुणे. मूळ रा. मिलिंदनगर, अहमदनगर) याला अटक केली आहे. तर स्पा चालक-मालक गणेश राजाराम घेवडे (वय अंदाजे 35 रा. महाळुंगे, ता. खेड पुणे), स्पा चालक-मालक रितेश (वय अंदाजे 32) यांच्यावर आयपीसी 370(3), 34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3,4,5,7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार भगवंता चिंधु मुठे (वय-39) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pimpri Chinchwad Crime Branch Raid On Spa Center)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमकर चौकातील मारुंजी रोडवर असलेल्या स्टेलर कॉम्प्लेक्स मधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या द वेदा स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी चार महिलांची सुटका केली. या महिलांकडून आरोपी जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत होते. वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महाले करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे
पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, प्रशांत महाले, पोलीस अंमलदार, सुनील शिरसाट, मारुती करचुडे, भगवंता मुठे, गणेश कारोटे,
राजाराम सराटे, सुधा टोके, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, सोनाली माने, पूनम आल्हाट यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil | कोल्हेंनी दाखवला, आढळराव पाटलांना ट्रेलर ! शब्दाचे पक्के असाल तर, माघार घ्यायची तयारी करा

Baramati Lok Sabha | शरद पवारांचा भाजपावर घणाघात, मोदी सरकारकडून खाणाऱ्याला महत्व, पिकवणाऱ्याला नाही, आता मालाला चांगला भाव…