Pimpri Chinchwad Editors Guild Awards | ‘पिंपरी चिंववड एडिटर्स गिल्ड’कडून ‘महाराष्ट्र टाईम्स’चे संपादक पराग करंदीकर, ‘लोकशाही मराठी’चे संपादक कमलेश सुतार, ‘एबीपी माझा’चे राहुल कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमतचे गोविंद वाकडे यांच्यासह राज्यातील 12 ज्येष्ठ पत्रकारांना पुरस्कार जाहीर, शनिवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते होणार सन्मान

पत्रकार हल्ला विरोधी व कायदा परिषद व पत्रकार हक्कासाठी लढणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव समारंभ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड एडिटर्स गिल्ड (Pimpri Chinchwad Editors Guild Awards) च्या वतीने पत्रकार हल्ला विरोधी व कायदा परिषद (Anti-Journalist Assault and Legal Council) व पत्रकार हक्कासाठी लढणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी (दि.19) सकाळी 9 वाजता निगडी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे प्रमुख वक्ते असणार आहेत. यावेळी ‘पिंपरी चिंचवड एडिटर्स गिल्ड’कडून ‘महाराष्ट्र टाईम्स’चे संपादक पराग करंदीकर, ‘लोकशाही मराठी’चे संपादक कमलेश सुतार, ‘एबीपी माझा’चे राहुल कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अव्दैत मेहता, न्यूज 18 लोकमतचे गोविंद वाकडे यांच्यासह 12 ज्येष्ठ पत्रकारांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे. (Pimpri Chinchwad Editors Guild Awards)

कार्यक्रमात पहिल्या सत्रात सकाळी 9.30 ते 11 यावेळेत ‘मी आणि पत्रकार हक्काची लढाई…’ या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्रामध्ये दैनिक सकाळचे संपादक सम्राट फडणीस (Samrat Phadnis), दैनिक लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे (Sanjay Awate), दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे संपादक सुनील माळी (Daily Pudhari Pune Editor Sunil Mali), सीविक मिररचे संपादक (Civic Mirror) अविनाश थोरात (Avinash Thorat), पत्रकार संदीप महाजन (Journalist Sandeep Mahajan), न्यूज 18 लोकमतचे (गडचिरोली) महेश तिवारी (Mahesh Tiwari) हे सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे (PCMC Commissioner) आयुक्त शेखर सिंह (IAS Shekhar Singh), मावळचे खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne), भोसरीचे आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge), भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप (BJP City President Shankar Jagtap), पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे (MLA Anna Bansode), भोसरीचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande), राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे (NCP City president Ajit Gavane), माजी नगरसेवक विठ्ठल नाना काटे (Vitthal Nana Kate), राहुल कलाटे (Rahul Kalate), मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले (MNS city president Sachin Chikhale) उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पुरस्काराचे वितरण होणार आहे. दैनिक महाराष्ट टाईम्सचे संपादक पराग करंदीकर
(Parag Karandikar), लोकशाही मराठीचे संपादक कमलेश सुतार (Kamlesh Sutar), एबीपी माझाचे राहुल कुलकर्णी
(Rahul Kulkarni), ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता (Advait Mehta), दैनिक पुण्यनगरीचे अनिल मस्के (Anil Maske),
पत्रकार डिजीटल मीडिया अमित मोडक (Amit Modak), पत्रकार संदीप महाजन, दैनिक लोकमत (यवतमाळ)
अविनाश खंदारे (Avinash Khandare), न्युज स्टेट महाराष्ट्र असो. एडिटर अश्विनी सातव-डोके (Ashwini Satav-Doke),
‘पोलीसनामा’चे मुख्य संपादक (Policnama Pune Editor) नितीन पाटील, दैनिक पुढारी (पुणे) आशिष देशमुख,
न्यूज 18 लोकमत (गडचिरोली) महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत (पिंपरी चिंचवड) गोविंद वाकडे (Govind Wakade)
यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

तिसऱ्या सत्रामध्ये ‘पत्रकार हल्ला विरोधी कायदा, वास्तव आणि गरज’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात
आले आहे. चर्चासत्रामध्ये दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे (मुंबई) संपादक पराग करंदीकर, लोकशाही मराठीचे (मुंबई)
संपादक कमलेश सुतार, टाईम्स नाऊ मराठीचे संपादक मंदार फणसे, बी.बी.सी मराठीचे संपादक आशिष दीक्षित,
दैनिक सकाळचे (मुंबई ब्युरो चिफ) विनोद राऊत, एबीपी माझाचे राहुल कुलकर्णी सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लेखक निवेदिका वसुंधरा काशीकर करणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | दुसर्‍या पत्नीच्या त्रासाला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाची गळफास घेऊन आत्महत्या; हडपसरमधील लॉजमधील घटना, गळफास घेतल्याचा व्हिडिओ केला रेकॉर्ड