Pimpri Chinchwad Murder Case | पिंपरी : सराईत गुन्हेगाराला पाठलाग करुन गाठलं, चाकू, कोयत्याने सपासप वार करुन निर्घृण खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Murder Case | सराईत गुन्हेगाराचा टोळक्याने पाठलाग करून त्याला भररस्त्यात आडवलं. त्यानंतर त्याच्यावर चाकू आणि कोयत्याने सपासप वार करुन त्याचा खून केला. ही घटना रहाटणी (Rahatani) येथे औंध-रावेत मार्गावरील (Aundh Ravet Road) पुलावर बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे.

रेहान अरिफ शेख (वय-19 रा. पिंपळे गुरव) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी ऋतिक चव्हाण, प्रेम मोरे, दीपक कोकाटे आणि इतर अनोळखी चार संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तेजस मनोहर हंसकर (वय-18, रा. शितोळेनगर, जुनी सांगवी) याने याप्रकरणी गुरुवारी (दि.2) वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे.(Pimpri Chinchwad Murder Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तेजस हा त्याचा मित्र रेहान शेख आणि हर्षद काटे यांच्यासोबत दुचाकीवरुन
औंध-रावेत मार्गावरुन रावेतच्या दिशेने जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांचा पाठलाग केला.
तीन दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी फिर्यादी आणि रेहन यांचा रस्ता अडवून सर्वांनी घेराव घातला.
त्यानंतर ऋतिक चव्हाण याने चाकूने रेहानच्या गळ्यावर व मानेवर सपासप वार केले.

तसेच त्याच्या सोबत असलेल्या दीपक कोकाटे याने त्याच्याकडे असलेला कोयता बाहेर काढून रेहान याच्या मानेवर जोरात
वार केला. यामध्ये रेहान याचा जागीच मृत्यू झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
रेहान शेख हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Police Record) आहे.
त्याच्यावर पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस ठाण्यात (Pimpri Chinchwad Police Station) वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन, पोलीस चौकीत अट्टल गुन्हेगारांची परेड (Videos)

Shivajirao Adhalrao Patil On Amol Kolhe | अमोल कोल्हेंनी केलेल्या ‘त्या’ आरोपाने आढळराव संतापले, म्हणाले ”पुरावे द्या, मी निवडणुकीतून माघार घेतो, अथवा तुम्ही बाहेर पडा”