Pimpri Crime Branch | पिंपरी : लोखंडी कोयत्यासह तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Crime Branch | आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची धडक कारवाई सुरु आहे. अशातच तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करुन शहरात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या (Pimpri Crime Branch) खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Squad) अटक केली आहे. ही कारवाई दिघी येथील जकात नाका येथे गुरुवारी (दि.11) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

गणेश शेषराव कांबळे (वय-21 रा. काटे वस्ती, दिघी गावठाण, दिघी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई सुधीर हरीश्चंद्र डोळस (वय-38) यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्य़ाद दिली असून आरोपीवर आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते.
त्यावेळी पथकाला माहिती मिळाली की, पिंपरी चिंचवड, पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केलेला
गुन्हेगार गणेश कांबळे (Criminal Ganesh Kamble) याच्याकडे धारदार शस्त्र असून तो जकात नाका येथील
सरकारी दवाखान्याबाहेर थांबला आहे. माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चौकशी असता तो विनापरवानगी शहरात आल्याचे निष्पन्न झाले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक हजार रुपये किंमतीचा लोखंडी कोयता जप्त केला.

आरोपी सराईत गुन्हेगार असून पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 यांनी पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर व जिल्ह्यातून
दोन वर्षासाठी तडीपार केले होते. तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन आरोपी शहरात आला होता. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On BJP | पवारसाहेब भाजपसोबत जाण्यास तयार नव्हते, हीच ‘त्या’ नेत्यांची अडचण होती, जयंत पाटलांचे प्रत्युत्तर