PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारीला साताऱ्यात, शिवसन्मान पुरस्काराने होणार सन्मानित

सातारा : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पहिला शिवसन्मान (Shiv Sanman Award) सोहळा जाहीर झाला आहे. एका भव्य कार्यक्रमात १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. (PM Narendra Modi)

हा पुरस्कार वितरण सोहळा ज्या ठिकाणी पार पडणार आहे त्या सैनिक स्कूल मैदानाची पाहणी आज खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केली. यावेळी त्यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आणि सुरक्षेचा आढावा घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार शिवप्रभूंचे राजघराणे व तमाम शिवभक्तांच्या वतीने देण्यात येणार आहे. दरम्यान, सभास्थळाची पाहणी केल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचनाही केल्या. यावेळी सुनील काटकर, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, काका धुमाळ, पंकज चव्हाण, विनीत पाटील इत्यादी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे स्थानबद्ध कारवाईचे शतक, आयुक्तांची एका वर्षात ऐतिहासिक कामगिरी

डेटिंग ॲपवरील ओळख पडली महागात, पुण्यातील तरुणीला 27 लाखांचा गंडा

पुणे : जागा विक्रीच्या बहाण्याने महिलेची 1 कोटीची फसवणूक, वकिलासह चार जणांवर FIR; दोघांना अटक

दोन कंपन्यांनी एकाच वितरकाला घातला गंडा ! हाय स्पीड मोटार लावून लो स्पीड ई दुचाकी असल्याचे सांगून केली फसवणूक

Shiv Sena Shinde Group | मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर शिंदे गट आक्रमक, ”छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा”