PMC Anti Encroachment Drive | न्यायालयाची स्थगिती उठताच पुणे मनपाचा अतिक्रमणांवर हातोडा; 20 शोरुम, फर्निचर मॉल इत्यादीवर कारवाई करून 3 लाख चौरस फूट बांधकाम पाडले (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMC Anti Encroachment Drive | पुणे महानगर पालिकेकडून Pune Municipal Corporation (PMC) अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. पालिकेच्या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात गेल्याने कारवाई थंडावली होती. मात्र, उच्च न्यायालयाकडून स्थगिती उठवल्यानंतर पुणे महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पुणे मनपाच्या बांधकाम विकास विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि.1) पाषाण (Pashan) येथील मुंबई-पुणे महामार्गावरील (Mumbai Pune Highway) विनापरवाना शोरुम, फर्निचर मॉल इत्यादीवर कारवाई करण्यात आली. विभागाकडून 20 दुकानावर कारवाई करून सुमारे 3 लाख चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले.

यापूर्वी या ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. त्या नंतर काही दुकानदारांनी मे उच्च न्यायालयात दावा दाखल करून स्थगिती आदेश मिळवली होती. मात्र 23 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने स्थगिती आदेश उठवले. यानंतर स्थानिक बंदोबस्त मिळवून आज कारवाई करण्यात आली. स्थगिती आदेश नंतर 6 दुकानदार सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यामध्ये आज स्थगिती आदेश मिळण्याची शक्यता असल्याने सकाळी लवकर कारवाई सुरू करण्यात आली. 6 पैकी 5 दुकानदारांवर यापूर्वी कारवाई करण्यात आली होती. ज्या दुकानदारावर कारवाई झाली नव्हती त्याच्यावर प्रथम कारवाई करण्यात आली. 6 दुकानदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिले. तोपर्यंत कारवाई झाली होती. आज 20 दुकानावर कारवाई करून सुमारे 3 लाख चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले.(PMC Anti Encroachment Drive)

हे बांधकाम HEMRL या संरक्षण विभागाच्या (HEMRL Pashan Pune) प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे.
या फर्निचर मॉल मुळे महामार्गावर वाहतुकीचा ताण येत होता. या बाबत HEMRL कडून तक्रारी करण्यात आल्या होत्या.
पुढील आठवड्यात समोरील बाजू कडील दुकानांवर कारवाई करण्यात येणार आहे.
चतुःशृंगी पोलीस ठाण्याचा स्थानिक बंदोबस्त प्राप्त करून कारवाई करण्यात येईल.
तसेच कीर्ती गार्डन येथील फार्म हाऊस वरही कारवाई करण्यात येणार आहे, असे उप अभियंता सुनील कदम
(Sunil Kadam Pune) यांनी सांगितले.

यावेळी कटर मशीन, दोन जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर, 15 बिगारी व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व ईतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.
ही कारवाई अधीक्षक राजेश बनकर, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल कदम उप अभियंता,
राहुल रसाळे शाखा अभियंता, समीर गडइ, यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Water Supply | बुधवारी बिबवेवाडी, कात्रज, कोंढवा बु. परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार

Workshop On Atrocities Act In Pune | ॲट्रॉसिटी कायद्याविषयी एक दिवशीय कार्यशाळेचे रविवारी आयोजन; निवृत्त न्यायाधीश सी एच थुल करणार उद्घाटन