PMJJBY | 330 आणि 12 रुपये डेबिट केल्याचा बँकेकडून मेसेज आला नाही तर नक्की तपासा, अन्यथा होईल 4 लाखाचं नुकसान; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  तुम्ही Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) आणि Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY) मध्ये रजिस्ट्रेशन केले आहे का. जर होय, तर मग चेक करा की या वर्षीच्या प्रीमियम कापला गेला किंवा नाही. म्हणजे जर तुमच्याकडे 330 रुपये आणि 12 रुपये प्रीमियम कापल्याचा मेसेज आला नाही तर ताबडतोब Bank Branch मध्ये जाऊन चेक करा. कारण तुमच्या दोन्ही पॉलिसी डिअ‍ॅक्टिव्हेट (Deactivate the policy) झाल्या तर तुम्हाला 4 लाख रुपयांच्या विमा कव्हरचे नुकसान होऊ शकते. इतकेच नव्हे तर कोविड 19 महामारी दरम्यान सुद्धा यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंत Bima cover मिळते. PMJJBY | pradhan mantri jeevan jyoti bima yojana covid 19 life insurance cover how to get insured in covid 19 situation how much premium in pmjjby

कसे उघडता येईल खाते

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana सर्व भारतीयांसाठी आहे. यामध्ये 18 ते 50 वर्षापर्यंतच्या प्रौढांना सहभागी होता येते. यामध्ये रजिस्टेशनसाठी बँक आणि Life insurance कंपन्यांमध्ये टायअप असते. यामध्ये अवघे 330 रुपये वार्षीक प्रीमियम देऊन एनरोल होता येते. 2 लाख रुपयांचे इन्श्युरन्स कव्हर मिळेल. याचा कालावधी वर्षभर असतो. दरवर्षी रिन्युअल करावे लागते.

विमा प्रीमियम न भरल्यास…

जर प्रीमियम भरला नाही तर पुन्हा वार्षिक प्रीमियम देऊन परत येऊ शकता. मात्र, यासाठी चांगल्या आरोग्याबाबत सेल्फ डिक्लेरेशन द्यावे लागेल.

लक्षात ठेवा

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana मध्ये Life cover 55 वर्षाच्या वयापर्यंत मिळते. कुणीही ग्राहक केवळ एक बँक अकाऊंट आणि एका इन्श्युरन्स कंपनीसोबतच या स्कीममध्ये सहभागी होऊ शकतो.

कसा होईल क्लेम

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana मध्ये विमाधारकासोबत दुर्घटना घडल्यास नॉमिनी क्लेम फॉर्म मृत्यु प्रमाणपत्रासह (डेथ सर्टिफिकेट) भरून त्या बँकेतून क्लेम करू शकतो ज्या बँकेत खाते आहे. यावर नॉमिनीला 2 लाख रुपये ट्रान्सफर केले जातात.

 

योजनेचे फायदे

1 मेडिकल टेस्टची आवश्यकता नाही.

2 वय 18 ते 50 वर्षा दरम्यान असावे. पॉलिसी 55 वर्षात मॅच्युअर होते.

3 प्लॅन दरवर्षी रिन्यू करवा लागतो, 2 लाख रुपयांचे कव्हर आहे.

4 330 रुपये वार्षिक प्रीमियमची रक्कम तुमच्या बँक खात्यातून ECS (Electronic Clearing Service) च्या द्वारे घेतली जाते.

5 PMJJBY च्या अंतर्गत जी रक्कम घेतली जाते, त्यामध्ये बँक Administrative Fees लावते. तसेच रक्कमेवर GST सुद्धा लागू आहे.

6 विमा पॉलिसी एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तीसाठी निवडता येते.

7 ECS झाल्यास बँक स्वताच अकाऊंटमधून पैसे कापून घेईल.

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY) या योजनेत दो लाख रुपयांपर्यंतचे Accidental Death/Disability Insurance Cover मिळते. ही पॉलिसी 1 वर्षासाठी आहे. पुन्हा रिन्यू करण्यासाठी प्रीमियम भरावा लागतो. तिचा वार्षिक प्रीमियम केवळ 12 रुपये आहे. हे पॉलिसी कव्हर 1 जून ते 31 मेपर्यंत राहते. इतर अटी PMJJBY सारख्या आहेत,

Web Tilte : PMJJBY | pradhan mantri jeevan jyoti bima yojana covid 19 life insurance cover how to get insured in covid 19 situation how much premium in pmjjby

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Serum Institute News | ‘सीरम’ची मोठी घोषणा ! तिसरी लस देखील पुण्यातच तयार होणार; सप्टेंबरपासून स्पुटनिक- V लसीचे उत्पादन

Pimpri Crime | भक्ती-शक्ती पुलावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू 

Woman Care | गरोदरपणात डाळिंब खाणे फायदेशीर आहे का?, जाणून घ्या