Police Bharati | पोलीस महाभरतीसाठीची मुदत पुन्हा वाढली; उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये तृतीयपंथीही करू शकणार अर्ज

0
308
Police Bharati | transgender can also apply online for the post of police constable
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) राज्यात नुकतीच मोठ्या पोलीस भरतीची घोषणा (Police Bharati 2022) केली होती. या घोषणेनुसार, तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस शिपायांची (Police Bharati 2022) भरती होणार आहे. त्यामुळे भरपूर तरुणांची स्वप्नं पूर्ण होणार आहेत. त्यासाठीची अधिसूचना जाहीर करून त्यानुसार 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या भरतीसाठी फक्त स्त्री आणि पुरुष हेच अर्ज करू शकत होते. पण त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे पोलीस शिपाई पदासाठी तृतीयपंथी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरू शकणार आहेत.

तृतीयपंथी उमेदवारांना अर्ज करता यावा, यासाठी अर्ज भरण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्य सरकार अर्जात सुधारणा करणार असून, ‘लिंग’ या श्रेणीत ‘तृतीयपंथी’ या पर्यायाचा समावेश करण्यात येणार आहे.तसेच तृतीयपंथी उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी पुढील वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंत निकष ठरविण्यात येतील, अशी माहिती राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात दिली आहे.

पोलिस शिपाई पदासाठीच्या भरती प्रक्रियेमध्ये तृतीयपंथींसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत अपयशी ठरली असल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारची कानउघाडणी केली होती. त्यानंतर या मुद्द्यावर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. अभय अहुजा यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी पुन्हा सुनावणी झाली. त्यावेळी महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य सरकार ऑनलाइन अर्जात सुधारणा करणार असून, ‘लिंग’ या श्रेणीत तृतीयपंथी पर्यायाचाही समावेश केला जाणार आहे. शिवाय सध्याच्या भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठी दोन पदे राखीव ठेवण्यात येणार आहेत, असे आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितले.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, सरकार याबाबत २८ फेब्रुवारीपर्यंत नियम तयार करेल.
त्यानंतरच सर्व उमेदवारांची शारीरिक, लेखी चाचणी घेण्यात येईल.
गृह विभागाच्या भरती प्रक्रियेत सामील होता यावे यासाठी भराव्या लागणाऱ्या अर्जात महिला आणि पुरुष,
असे दोनच पर्याय असतात. या दोन पर्यायांसोबत तृतीयपंथी पर्याय उपलब्ध असावा,
यासाठी दोन तृतीयपंथी उमेदवारांनी याचिका केली होती.
त्यावर मॅटने राज्य सरकारला तृतीयपंथींसाठी पर्याय उपलब्ध करण्याचा आदेश दिले आहेत.

Web Title :- Police Bharati | transgender can also apply online for the post of police constable

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Leader Ajit Pawar | ‘अरे गोपीचंदा काय बोलतो’ असे म्हणत पडळकरांच्या वक्तव्यावर अजित पवारांची टोलेबाजी; अनेक मुद्द्यांवर मांडले मत

Mumbai Crime | देवाचा प्रसाद देतो असे सांगून 60 वर्षीय वृद्धाने केला 11 वर्षीय मुलीवर बलात्कार