Police Raid On Spa Center In Sangvi | सांगवी येथे स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका (Video)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Police Raid On Spa Center In Sangvi | सांगवी परिसरातील एका स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा (Prostitution Racket) पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) गुन्हे शाखेच्या (Pimpri Crime Branch) अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने (Pimpri Police AHTU) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. तर दोन जणांवर गुन्हा दाखल करून एकला अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.11) रात्री नऊच्या सुमारास पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथील व्हिजन गॅलरी मॉलमधील (Vision Galleria Mall) ‘न्यु ओम स्पा’ (New Om Spa) येथे करण्यात आली.

स्पा मॅनेजर संदीप संतोष तिवारी Sandeep Santosh Tiwari (वय 22 (रा. शॉप नं. 309, व्हिजन गॅलरी मॉल, कुणाल आयकॉन रोड, पिंपळे सौदागर, पुणे, मूळ रा. पुरे राम दयाळ फैजाबाद, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर स्पा चालक मालक आकाश साळवे (रा. कोथरूड पुणे) याच्यावर आयपीसी 370(3), 34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3,4,5,7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार मारुती महादेव करचुंडे (वय-39) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Police Raid On Spa Center In Sangvi)

पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवरील व्हिजन गॅलरी मॉल मधील शॉप नंबर 309 मध्ये असलेल्या ‘न्यु ओम स्पा’ येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाला समजली.
त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर अचानक छापा टाकून दोन तरुणींची सुटका केली.
आरोपी स्पा सेंटरमध्ये पीडित मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते.
वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले.
या कारवाईत 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुढील तपास सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस अंमलदार, सुनील शिरसाट, मारुती करचुडे, भगवंता मुठे, गणेश कारोटे, सुधा टोके, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Baramati Lok Sabha | शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, प्रतिक्रिया देणे टाळले (Video)

Baramati Lok Sabha | बारामतीकरांचा सवाल, शरद पवारांच्या वक्तव्याने सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू आले, मग अजितदादांचं वक्तव्य का खटकलं नाही?

Murlidhar Mohol | यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी : मुरलीधर मोहोळ

Amol Kolhe | गरोदर महिलांच्या पोषण आहारात अळ्या, राज्यभरात खळबळ! अमोल कोल्हे संतापले, म्हणाले ”पोषण नक्की कोणाचं सुरुय?” (Video)