Poona Gujarati Bandhu Samaj | श्री पूना गुजराती बंधू समाज ची निवडणूक बिनविरोध ! अध्यक्ष पदी नितीनभाई देसाई व मॅनेजिंग ट्रस्टी पदी राजेश शहा यांची फेरनिवड निवड

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Poona Gujarati Bandhu Samaj | श्री पूना गुजराती बंधू समाज च्या कार्यकारिणीची सन २०२४ – २०२९ या पाच वर्षांसाठी निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत संस्थेच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा नितीनभाई देसाई (Nitinbhai Desai) यांची एकमताने निवड झाली. २०११ पासून नितीनभाई देसाई हे या संस्थेचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. उपाध्यक्षपदी वल्लभभाई पटेल यांची प्रथमतःच निवड झाली. तर मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून जयराज ग्रुपचे (Jairaj Group) संचालक राजेश शहा (Rajesh Shah) यांची सलग दुसऱ्यांदा सर्वानुमते निवड झाली. जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून नैनेश नंदू यांची निवड करण्यात आली. सचिव पदी राजेंद्र शहा यांची तर खजिनदार म्हणून हरेश के शहा यांची निवड झाली. एकूण २१ ट्रस्टींमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, तीन महिला प्रतिनिधी व १६ ट्रस्टी अशी संपूर्ण कार्यकारिणी निवड झाली. (Poona Gujarati Bandhu Samaj)

नितीनभाई देसाई हे पुण्यातील नामांकित एच व्ही देसाई आय हॉस्पिटल तसेच दि पूना गुजराती केळवणी मंडळ या संस्थांचे अध्यक्ष आहेत. राजेश शहा हे दि पूना गुजराती केळवणी मंडळ या नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेचे चेअरमेन व एच व्ही देसाई आय हॉस्पिटल चे चेअरमेन असून पूना हॉस्पिटल, जनसेवा फॉऊंडेशन, विवेकानंद इन्स्टिटयूट इत्यादी अनेक संस्थांच्या विविध पदांवर कार्यरत आहेत.

ADV

श्री पूना गुजराती बंधू समाज ही सन १९१३ सालापासून पुण्यातील ११० वर्षांची परंपरा असलेली गुजराती समाजासाठी
काम करणारी संस्था आहे. ही संस्था एक एक शतकाहून अधिक काळापासून पुण्यातील गुजराती समाजातील लोकांसाठी
सामाजिक, शैक्षणिक, व्यवसाय, आरोग्य अशा विविध विषयांबाबत कार्यरत आहे.
या संस्थेचे सहा हजार पेक्षा जास्त आजीवन सभासद आहेत. या संस्थेचे कोंढवा येथे सहा एकर जागेमध्ये गुजरात भवन
व जयराज स्पोर्ट्स & कन्व्हेन्शन सेंटर ही नवीन सांस्कृतिक भवन सुमारे २,५०,००० चौरस फूट जागेवर उभारण्यात
येत आहे. या ठिकाणी विविध खेळ व राष्ट्रीय स्तरीय स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या वर्षाच्या अखेरपर्यंत त्याचे उदघाटन करण्याचे नियोजन असल्याचे राजेश शहा यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Thane Central Jail | ई-ग्रंथालय उदघाटन कार्यक्रम: ‘ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांकरीता ई-ग्रंथालय’