Porsche Car Accident Pune | ‘त्या’ अल्पवयीन मुलाच्या आजोबांचे थेट छोटा राजनशी संबंध?, शिवसेना नेत्याने सांगितला 2009 चा ‘तो’ प्रसंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Porsche Car Accident Pune | पुणे कार अपघातात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. अग्रवाल कुटुंबीयांचं (Vishal Agarwal Family) अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आल आहे. पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे (Vishal Agarwal Arrest). त्यांची आता चौकशी सुरु आहे. दरम्यान, या अल्पवयीन मुलाच्या अजोबांवरही खटला चालू आहे. शिवसेना नेते अजय भोसले (Shivsena Leader Ajay Bhosale) यांच्या हत्येची सुपारी छोटा राजनला देण्यावरुन हा खटला सुरु आहे. अजय भोसले यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखतीत ही माहिती दिली.(Porsche Car Accident Pune)

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण समोर आल्यानंतर अग्रवाल कुटुंबियांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर चर्चा केली जातेय (Kalyani Nagar Accident) . या प्रकरणातील आरोपीच्य आजोबांवरही खटला सुरु आहे. याबाबत अजय भोसले म्हणाले, माझी आणि राम कुमार अग्रवाल (Ram Kumar Agarwal) यांच्याशी मैत्री होती. या दोन (सुरेंद्र आणि राम अग्रवाल) भावांत मालमत्तेवरुन काही वाद चालू झाले होते. त्यामुळे हा वाद मी मिटवावा अशी त्यांची इच्छा होती. मात्र, ही घरगुती समस्या असल्याने त्यांनी तो मिटवावा असं मी त्यांना म्हटलं. मी राम अग्रवालला सहकार्य करत असल्याचा दावा सुरेंद्र अग्रवाल यांनी केला होता. दरम्यान, हा वाद सुरु असताना सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agarwal) हे बँकॉकला जाऊन छोटा राजनला भेटून आले आणि त्यांना सुपारी दिली. त्यामुळे मला छोटा राजनचे फोन यायचे, मी त्याच्याशी फोनवर बोलायचो. मी तेव्हा त्यांना सांगितलं होतं की तुमच्या (अग्रवाल कुटुंबातील) घरातील भांडण आहेत, तुम्ही घरात मिटवून घ्या. मात्र, सुरेंद्र अग्रवालने छोटा राजनला जाऊन सांगितलं की अजय भोसलेच हे घडवून (कुटुंबातील समेट) देत नाही.

2009 साली वडगाव शेरी येथून शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवत होतो.
त्यावेळी सर्वांत पहिला गोळीबार सकाळी साडेदहा वाजता जर्मन बेकरी येथे झाला. परंतु, ती गोळी पिस्तुलातून निघालीच नाही.
मग आम्ही त्यांच्या पाठलाग केला. 15-20 फुटांचं अंतर होतं आणि दुसरी गोळी मारली.
त्यावेळी ती गोळी माझ्या मित्राच्या छातीत घुसली. त्याला आम्ही तात्काळ रुग्णालयात दाखल केला.
याप्रकरणी पोलीस केसही झाली. मग अग्रवाल यांचे नाव समोर आलं. पण 2009 सालापासून आतापर्यंत कोणतीच
कारवाई झाली नाही. सर्व पुरावे आहेत, पण अटक होत नाही, असा आरोप अजय भोसले यांनी केला. (Chhota Rajan)

पैशाच्या जोरावर सर्वकाही खरेदी करता येते. रिक्षावाल्याच्या हातून असा अपघात झाला असता तर त्याला साधं पाणीही
प्यायला मिळालं नसतं. आज तिथं बर्गर, पिझ्झा सर्व खायला मिळतंय. मी माजी केश लढतो आहे, पण आज ज्या दोन निष्पाप तरुणांचा बळी गेला आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी अजय भोसले यांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Builder Vishal Agrwal Arrest | पुणे न्यायालयाच्या बाहेर गोंधळ! विशाल अग्रवालवर शाई फेकली; 5 ते 8 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात (Video)

Porsche Car Accident In Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन धनिकपुत्राने पबमध्ये 90 मिनिटात उडवले 48 हजार, पोलीस आयुक्तांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Builder Vishal Agrwal Arrest | पुणे हिट अँड रन प्रकरण : अपघातानंतर बिल्डर विशाल अग्रवालने पोलिसांना दिला होता असा गुंगारा

Devendra Fadnavis On Rahul Gandhi | पुण्याच्या घटनेचं राजकीयकरण केलं हे निषेधार्य, पोलिसांनी योग्य कारवाई केली – देवेंद्र फडणवीस