Post Office Schemes | फायद्याची गोष्ट ! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 बेस्ट सेव्हिंग स्कीम आहेत अतिशय खास; गुंतवणुकीवर मिळेल ‘डबल’ नफा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिसच्या अनेक स्कीम (Post Office Schemes) आहेत ज्या छोट्या बचतीमधून मोठे काम करतात. पोस्ट ऑफिसच्या या छोट्या बचत योजनांमध्ये (Post Office Schemes) गुंतवणुकीतून सरकारी गॅरंटी मिळते, तसेच चांगल्या रिटर्नसह टॅक्स सूट सुद्धा मिळते. अशा पाच खास स्कीमबाबत जाणून घेवूयात…
1. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (POMIS) :
जोखीमसह गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम चांगला पर्याय आहे.
यात 6.6 टक्के व्याज मिळते. व्याजाची रक्कम दरमहा खात्यात टाकली जाते.
5 वर्षाची ही स्कीम असून पुढे 5-5 वर्षासाठी वाढवता येते.
कमाल 4.5 लाख रुपये ठेवू शकता. जॉईंट खाते सुद्धा उघडू शकता, यासाठी 9 लाख लिमिट आहे.
2. सीनियर सिटीजन सेव्हिंग अकाऊंट (SCSS) :
या योजनेत 7.4 टक्के व्याज मिळते. हे व्याज तिमाही आधारवर खात्यात टाकले जाते.
यात इन्कम टॅक्स सवलतीची सुविधा आहे.
3. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) :
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट फिक्स्ड डिपॉझिट प्रमाणे आहे.
पब्लिक प्रोव्हिडंट फंडप्रमाणे या स्कीमवर सुद्धा व्याजावर कोणताही टॅक्स नाही.
यात 6.8 टक्के व्याज, वार्षिक आधारवर मिळते.
परंतु व्याजाची रक्कम स्कीमच्या मॅच्युरिटीवर मिळते.
जमा रक्कमेवर टॅक्स सवलत मिळते.
4. पोस्ट ऑफिसमध्ये टाइम डिपॉझिट :
टाइम डिपॉजिट योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षासाठी असते. किमान 200 रुपयांनी गुंतवणुक सुरू करू शकता. पहिल्या 3 वर्षासाठी 5.5 टक्के तर पाचव्या वर्षी 6.7 टक्के दराने व्याज मिळते.
हे व्याज वार्षिक प्रकारे मिळते. तिमाही आधारवर व्याज मिळते. व्याजावर टॅक्स लागत नाही.
–
5. किसान विकास पत्र (KVP) :
किसान विकास पत्र पोस्ट ऑफिसमध्ये खरेदी करू शकता. याची सुरुवात 1000 रुपयांपासून होते. हे बाँडप्रमाणे प्रमाणपत्राच्या रूपात जारी केले जाते.
यावर सरकारकडून ठरलेले व्याज मिळते. सरकार दर महिन्यासाठी व्याज दर ठरवते.
6.9 टक्केच्या व्याजदाराने या स्कीम अंतर्गत 9 वर्ष आणि 2 महिने म्हणजे 110 महिन्यात पैसे डबल होतात.
Web Title : Post Office Schemes | invest post office 5 best saving schemes and get double return check how
Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
नटून-थटून ऑनलाइन क्लास घेत होती टीचर, मुलीने सर्वांसमोर केले असे वर्णन; पहा Viral Video