Postal Life Insurance | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये दरमहिना जमा करा केवळ ‘एवढया’ रूपयांचा प्रीमियम; 30 वर्षानंतर मिळतील 13 लाख रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Postal Life Insurance | पोस्टल डिपार्टमेंट (Post Office) सेव्हिंग अकाऊंट, स्मॉल सेव्हिंग स्कीमसह लाईफ इन्श्युरन्स (life insurance) सुद्धा देते. ही देशातील सर्वात जुनी इन्श्युरन्स पॉलिसीपैकी एक आहे, जिची सुरूवात 1900 च्या अगोदर सुरू झाली होती. आज आपण पोस्ट ऑफिस लाईन इन्श्युरन्स (Postal Life Insurance) च्या संतोष पॉलिसी (Santosh policy) बाबत जाणून घेणार आहोत.

संतोष पॉलिसीमध्ये तुम्ही दरमहिना 1332 रुपयांचा प्रीमियम (premium) जमा करून 13 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकता.
यासाठी तुम्हाला 30 वर्षापर्यंत प्रीमियम जमा करावा लागेल. या पॉलिसीबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

कोण घेऊ शकतात PLI चा लाभ

या पोस्टल लाईफ इन्श्युरन्सची सुरुवात झाली तेव्हा ती केवळ पोस्ट ऑफिसच्या कर्मचार्‍यांसाठी होती.
नंतर तिची कक्षा वाढवून सरकारी आणि निम-सरकारी कर्मचार्‍यांसाठी केली.

हे सुद्धा घेऊ शकतात पॉलिसी

सध्या ही पॉलिसी सर्व नोकरी करणारे आणि गावात राहणार्‍या लोकांना मिळत आहे.
यानंतर सुद्धा पोस्टल लाईफ इन्श्युरन्सला थोडे मर्यादित केले आहे.
आता ही पॉलिसी ग्रामस्थांसह, प्रोफेशनल, एनएसई आणि बीएसई लिस्टेड कंपन्यांमध्ये काम करणारे लोकसुद्धा घेऊ शकतात.

पीएलआयची संतोष पॉलिसी

पोस्टल डिपार्टमेंटकडून ही पॉलिसी (Postal Life Insurance) दोन भागात विभागली आहे.
पहिल्या पार्टमध्ये ते लोक येतात, जे गावात राहतात. दुसर्‍या पार्टमध्ये त्या लोकांना ठेवले आहे जे नोकरी करतात.
पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षासाठी सुद्धा पॉलिसी असते आणि यामध्ये विशेष बाब ही आहे की, 5 वर्षावर सुद्धा बोनसचा रेट समान मिळतो,
जो इतर पॉलिसीमध्ये असतो. पोस्ट ऑफिसकडून बोनसचा दरसुद्धा खुप चांगला दिला जातो.

संतोष पॉलिसीमध्ये मिळणार्‍या सुविधा

पोस्टल डिपार्टमेंटकडून मिळणारी संतोष पॉलिसी एक एंडोंमेन्ट प्लान आहे, ज्यामध्ये सम अश्युअर्डशिवाय बोनसचा लाभ मिळतो.
ही पॉलिसी केंद्र सरकारकडून चालवली जाते.

 

वार्षिक 15,508 रुपयांचा प्रीमियम

या पॉलिसीमध्ये धारकाला दर महिना 1332 रुपयांचा प्रीमियम भरावा लागतो.
याचा अर्थ हा आहे की वार्षिक 15,508 रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल.
30 वर्षांच्या पॉलिसीमध्ये पॉलिसीधारकाला संपूर्ण टेन्चरमध्ये 4,55,551 रुपये द्यावे लागतील.

संतोष पॉलिसी मॅच्युरिटी कॅलक्युलेशन

पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर पॉलिसी धारकाला 12,80,000 रुपये मिळतील. या पॉलिसीमध्ये 5 लाख रुपयांचा सम अश्युअर्ड आणि 7,80,000 रुपयांच्या बोनसचा समावेश आहे.
या पॉलिसीमध्ये प्रति हजार 52 रुपये बोनस मिळतो. दरवर्षी बोनसची घोषणा सरकारकडून केली जाते.

 

Web Title : Postal Life Insurance | know about postal life insurance santosh policy premium maturity and other benefits

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Model and Actress Swati Hanamghar | अभिनेत्री स्वाती हनमघर ठरल्या ‘विआ मिस अँड मिसेस इंडिया 2021’ च्या फस्ट रनरअप आणि मिसेस फोटोजेनीक

Aryan Khan Drug Case | NCB कडून मोठं ऑपरेशन? दिल्लीसह गुजरात अन् मध्य प्रदेशच्या अधिकार्‍यांची मुंबईत एन्ट्री

Pune Crime | ‘आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट’, तडीपार गुंडाकडून पोलिसांना जिवे मारण्याची धमकी