Prabha Atre Passed Away | पद्मविभूषण स्वयमयी डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Prabha Atre Passed Away | किराणा घराण्याच्या गायिका पद्यपिभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे त्यांनी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवात समारोपाचे गायन केले नव्हते. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. प्रभा अत्रे यांनी नवी दिल्ली येथे इंडिया हॅबिटँट सेंटर येथे हिंदी आणि इंग्रजीमध्ये संगीतावरील ११ पुस्तके एकाचवेळी एकाच मंचावरुन प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे.

पुणे येथील ‘गानवर्धन’ ह्या प्रसिद्ध संगीत संस्थेच्या २२हून अधिक वर्षे अध्यक्षा होत्या. प्रभाताईंनी पुण्यात ‘स्वरमयी गुरुकुल’ संस्थेची स्थापना केली. ह्या संस्थेद्वारा पारंपरिक गुरू-शिष्य शैलीतील संगीत शिक्षण व समकालीन संगीत शिक्षणाचा मेळ घालण्यात आला आहे. ह्या संस्थेमार्फत, प्रभा अत्रे फाउंडेशनद्वारा अनेक नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.

डॉ. प्रभा अत्रे या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक प्रमुख गायिका म्हणून गणल्या जातात. त्या पं. सुरेशबाबु माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या आहेत. भारत सरकारने त्यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल १९९० मध्ये पद्यश्री आणि २००२ मध्ये पद्यभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच २०२२ मध्ये पद्यविभूषण देऊन त्यांचा गौरव केला आहे.

प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात आबासाहेब व इंदिराबाई अत्रे यांच्या पोटी १३ सप्टेंबर १९३२ मध्ये झाला. इंदिराबाई गाणे शिकत असताना त्यापासून प्रेरति होऊन प्रभाताई वयाच्या आठ वर्षी शास्त्रीय गायनाकडे वळल्या. हिराबाईकडे शिकत असताना प्रभाताई त्यांना भारताच्या विविध भागात होणार्‍या कार्यक्रमांमध्ये साथ करत असत. संगीत शिकत असतानाच त्यांनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली.

प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक आहे.
ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे
प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याचे कामी त्यांचे मोठे योगदान गणले जाते.
आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वत: रचलेल्या बंदिशी सादर करतात. त्यांच्या काही रचना, जसे, मारू बिहाग
रागातील ‘जागू मैं सारी रैना’, कलावती रागातील ‘तन मन धन’, किरवाणी रागातील ‘नंद नंदन’, ह्या श्रोतृवृंदाच्या
विशेष पसंतीच्या रचना आहेत.

प्रभाताईंनी अपूर्व कल्याण, मधुरकंस, पटदीप – मल्हार, तिलंग – भैरव, भीमकली, रवी भैरव यांसारख्या नव्या रागांची
रचनाही केली आहे. तसेच किराणा घराण्याच्या गायकीत त्यांनी प्रथमच टप्पा गायनाचा परिचय करवून दिला.

लेखन

डॉ. प्रभा अत्रे यांनी मराठी व इंग्लिश भाषेत अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील पहिले पुस्तक ‘स्वरमयी’
असून त्यात संगीतावर आधारित निबंध व लेख आहेत. ह्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
स्वरमयी प्रमाणेच त्यांच्या ‘सुस्वराली’ (१९९२) या दुसºया पुस्तकालाही लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
मध्य प्रदेश शासनाने दोन्ही पुस्तकांचे हिंदी भाषेत अनुवाद प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या स्वरांगिणी ( इ.स. १९९४) व
स्वररंजनी (इ.स. २००६) या मराठी भाषेतील पुस्तकांत त्यांनी रचलेल्या ५०० शास्त्रीय रागबद्ध रचना व लोकरचना आहेत.
त्यांचे पाचवे पुस्तक, ‘अंत:स्वर’ हा त्यांनी लिहिलेल्या कवितांचा संग्रह आहे.
ह्या पुस्तकाचा इंग्रजी भाषेत अनुवाद झाला आहे.

संगीत क्षेत्रातील कार्य

आकाशवाणीच्या संगीत विभागात सहाय्यक निर्मात्या म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे.
आकाशवाणीच्या मराठी व हिंदी भाषा विभागाच्या ‘अ’ श्रेणीच्या नाट्य कलाकार.
व्यावसायिक संगीत नाट्यांमध्ये प्रमुख स्त्री भूमिका. नेदरलँड्स, स्वित्झरलंड येथील शैक्षणिक संस्थांमध्ये;
तसेच कॅलिफोर्निया व कॅलगरी (कॅनडा) येथील विद्यापीठांमध्ये संगीताच्या मानद प्राध्यापिका.
महाराष्ट्र सरकारतर्फे संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रभाताईंची ‘विशेष कार्यकारी न्यायाधीश’पदी नियुक्ती.
मुंबईच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात प्राध्यापिका व संगीत विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले.
इ.स. १९९२च्या दरम्यान प्रभाताईंनी पंडित सुरेशबाबू माने व हिराबाई बडोदेकर संगीत संमेलन हा वार्षिक संगीत महोत्सव
सुरू केला. दरवर्षी डिसेंबर महिन्यात मुंबई येथे हा महोत्सव आयोजित करण्यात येतो.
इ.स. १९८१ पासून ‘स्वरश्री’ ध्वनिमुद्रण कंपनीच्या मुख्य संगीत निर्मात्या व दिग्दर्शिका.
केंद्रीय चित्रपट प्रमाण बोर्ड, मुंबई यांच्या सल्लागार समितीत सदस्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Srinivas Patils Wife Rajni Devi Passes Away | खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी यांचे निधन

Pune Police Inspector Transfer News | पुण्यातील 15 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; मुंढवा, भारती विद्यापीठ, येरवडा, अलंकार पोलीस स्टेशनचा समावेश