Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana : शेतकऱ्यांना भरावे लागतील महिन्यातून फक्त 55 रुपये अन् मिळतील 36 हजार रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशातील छोट्या शेतकऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. ज्यामध्ये किसान सम्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जात आहेत. मात्र, आता सरकारच्या एका योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 36 हजार रुपये मिळू शकतात. ‘किसान मानधन’ असे या योजनेचे नाव. ही एक पेन्शन योजना आहे.

किसान मानधन योजना ही एक पेन्शन योजना असून, तुम्हाला 60 वर्षांनंतर दरमहा 3000 रुपये म्हणजेच 36,000 रुपये दरवर्षी पेन्शन म्हणून दिली जाणार आहे. पण तुम्हाला मासिक योगदानासाठी 55 रुपये भरावे लागणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून ही योजना लागू केली जात आहे.

कोणाला मिळेल या योजनाचा लाभ?

–  छोटे आणि सीमांत शेतकरी ज्यांचे वय 18 ते 40 वर्षांदरम्यान…

–  ज्यांच्याकडे 2 हेक्टर शेतीयोग्य जमीन…

कोणत्या कागदपत्रांची आहे गरज?

–  आधारकार्ड

–  ओळखपत्र

–  वयाचे प्रमाणपत्र

–  उत्पन्नाचे प्रमाणपत्र

–  शेतीसंबंधी पत्रे

–  बँक खाते पासबुक

–  मोबाईल नंबर

–  पासपोर्ट साइज फोटो

कशी करायची नोंदणी?

–  कॉमन सर्व्हिस रजिस्ट्रेशनवर जाऊन नोंदणी करू शकता

–  maandhan.in वर जाणे गरजेचे

–  maandhan.in/auth/login वर जाऊन Here To Apply पर्यायावर क्लिक करा

–  फोन नंबरही द्या

–  सर्व माहिती त्यावर द्या

–  OTP जनरेट करून त्यावर क्लिक करणे गरजेचे

–  सर्व माहिती भरल्यानंतर Submit केल्यानंतर तुम्हाला प्रिंटआउटही काढावी लागणार आहे

लाभार्थीचा मृत्यू झाल्यास…

जर तुम्ही ही योजना मधूनच सोडली तर जमा केलेले पैसे सुरक्षित राहतील. जमा रकमेवर बचत खात्यानुसार व्याज दिले जाणार आहे. जर पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला त्याची निम्मी रक्कम मिळू शकते.