Prajakta Mali | प्राजक्ता माळी करतीये फॅमिलीसोबत कर्जतला वाढदिवस साजरा; फोटो केले शेअर

पोलीसनामा ऑनलाइन – मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही नेहमी चर्चेत असते. अगदी छोट्या पडद्यापासून, चित्रपट आणि आता ओटीटी अशा सर्वच माध्यमातून प्राजक्ता प्रेक्षकांचे निखळ मनोरजंन करत असते. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने (Prajakta Mali) तिच्या अभिनयाच्या बळावर स्वतंत्र स्थान निर्माण केले. प्राजक्ता माळी हिचा आज वाढदिवस (Prajakta Mali Birthday) असून तिने तो तिच्या फॅमिलीसोबत अगदी आनंदात साजरा केला आहे. प्राजक्ता तिचा 34 वाढदिवस कर्जतमध्ये निसर्गाच्या सानिध्यात कुटुंबियांसोबत साजरा केला आहे. तिचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आङेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अदांनी व हास्याने चाहत्यांना घायाळ करते असते. ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असून तिच्या लाईफ अपडेट ती चाहत्यासोबत शेअर करायला विसरत नाही. प्राजक्ताचे इंस्टाग्रामवर 2 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. तिने नुकताच कर्जत मध्ये तिचे स्वप्न असलेले फार्म हाऊस (Prajakta Mali Farm House) खरेदी केले. तिने वाढदिवसानिमित्त तिच्या या फार्म हाऊसवर फॅमिली सोबत वेळ घालवला आहे.

प्राजक्ताने इंस्टाग्रामवर तिचे हे कर्जत मधील फोटो शेअर केले आहे. यामध्ये ती धबधब्यामध्ये भिजताना व पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे. यावेळी तिच्या सोबत तिची मोठी फॅमिली दिसत असून तिने व्यस्त शेड्युलमधून कुटुंबियांसाठी वेळ काढला आहे. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शन दिले आहे की, ”निसर्ग तुम्हाला शांती देतो परंतु कुटुंबियांसोबत निसर्गाचा आस्वाद घेणं म्हणजे तुमच्यासाठी एक साधनाच आहे.” तसेच तिने #झरे #छोटेधबधबे #घराजवळ #thegreenmontana #karjat #monsoon #nature #love #green #water #forestbath असे हॅशटॅग देखील दिले आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही सध्या सोनी मराठीवरील
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi HasyaJatra ) या फॅमिली शो मध्ये झळकत आहे. सुरुवातीला तिने 2014 साली ‘जुळून येती रेशीमगाठी’ (Julun Yeti Reshimgathi) या मालिकेमध्ये भूमिका केली. तिची ही भूमिका खूप गाजली. त्यानंतर तिने ‘पार्टी’(Party), ‘हंप्पी’ (Hampi) आणि ‘पावनखिंड’(Pawankhind) अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वी तिची ‘रानबाजार’ (Raanbaazaar) ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

यामधील तिची बोल्ड भूमिका चाहत्यांना आवडली होती. आज (दि.08.)
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा वाढदिवस असून तिने तिच्या कर्जतच्या फार्मवर
तो कोणत्याही मोठ्या पार्टीशिवाय साजरा केला आहे. चाहत्यांना तिचे हा ‘नो मेकअप लूक’
आवडला असून तिच्या फोटोंवर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parking Regulations Revamped at Kokane Chowk in Pimple Saudagar to Enhance Traffic Flow