Gold Rate : आणखीनच ‘स्वस्त’ झालं सोनं, दरामध्ये मोठी घसरण, चांदीची ‘चमक’ देखील ‘फिक्की’, जाणून घ्या लेटेस्ट रेट्स

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. सोन्यासोबत चांदीचे दरही उतरले आहेत. सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

देशभरात सराफा बाजारात बुधवारी पुन्हा एकदा सोन्याच्या किमती कमी झाल्याचे पाहिला मिळाले. 24 कॅरेट सोन्याचा दर 337 रुपयांनी कमी होऊन हा दर 49,079 इतका झाला आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर चांदीचे दरही कमी झाले आहेत. चांदीच्या दरात 749 रुपयांनी घसरण झाली आहे.

असा आहे सोन्याचा दर…

इंडिया बुलियन एँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माध्यमातून जारी केलेले सोन्याचे दर 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या दहा ग्रॅमसाठी 49,079 आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 48,000 रुपये प्रतिदहा ग्रॅम इतका झाला आहे.

चांदीच्या दरातही मोठी घसरण

सोन्यासह चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आता चांदीचा प्रतिकिलो दर 66,200 रुपये झाला आहे.