ब्रिटनच्या शाही विवाह सोहळ्याला हजेरी लावणार प्रियंका

मुंबई : वृत्तसंस्था 

आपल्या अभिनयाने केवळ भारतातच नाही तर परदेशात देखील आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्राला थेट प्रिन्स हॅरी यांच्या शाही लग्नाचे आमंत्रण आले आहे. प्रिन्स हॅरीची होणारी पत्नी मेगन मर्कले आणि प्रियंका यांचीखास मैत्री आहे. प्रियंकाने हा आनंद आपल्या इंस्टाग्राम पेजवर व्यक्त केला.

मेगन मर्कले आणि ब्रिटन चे प्रिन्स हॅरी यांचा मागील वर्षी साखरपुडा झाला होता. मागील वर्षी २७ नोव्हेम्बर ला त्यांनी याची घोषणा केली होती. तेव्हा इंस्टाग्राम वर आपला आनंद व्यक्त करताना तिने लिलाले होते की,” मेगन आणि प्रिन्स हॅरी तुमचे अभिनंदन ,मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे मेगन ,तू याची हकदार आहेस ,नेहमी आनंदी राहा” अशी पोस्ट लिहिली होती . यावरूनच अंदाज येतेओ की मेगन आणि प्रियंका किती जवळच्या मैत्रिणी आहेत. त्यांची मैत्री तीन वर्षापासूची आहे. सध्या प्रियांका या लग्नाच्या तयारीला लागली आहे. प्रियंकाचे अजून कपड्यांची निवड देखील बाकी आहे असे सोशल द्वारा सांगितले आहे. प्रिन्स हॅरी चे हे दुसरे लग्न आहे.

 

You might also like