PUBG गेम्स बनवणारी कंपनी पुढील आठवड्यात आणतेय 11 वर्षातील सर्वात मोठा IPO ! जाणून घ्या याच्या खास गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पब्जी PUBG गेम्स बनवणारी कंपनी क्राफ्टन (Krafton Inc) पुढील आठवड्यात आपला आयपीओ IPO लाँच करणार आहे. या आयपीओमध्ये कंपनी आपले 20% पेक्षा जास्त इक्विटी शेयर जारी करेल आणि 5 बिलियन डॉलर म्हणजे 37,000 कोटीपर्यंत जमा करेल. परंतु क्राफ्टनचा आयपीओ भारतात नव्हे, तर दक्षिण कोरियामध्ये लाँच होईल. यामुळे भारतीय गुंतवणुकदारांना Indian Investors यामध्ये इन्व्हेस्ट करण्यात अडचण येईल.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

क्राफ्टनचा आयपीओ दक्षिण कोरियाचा मागील 11 वर्षातील सर्वात मोठा आयपीओ IPO असेल.
यापूर्वी Samsung लाईफ इन्श्युरन्सने देशात 4.4 बिलियन डॉलरचा आयपीओ लाँच केला होता.
क्राफ्टनने राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची गुंतवणूक Investment असलेली कंपनी नजारा टेक्नोलॉजीस (Nazara Tech) ची सहकारी कंपनी Nodwin Gaming मध्ये 164 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

दक्षिण कोरियन स्टॉक एक्सचेंजने म्हटले की, क्राफ्टनला आयपीओ लाँच करण्याची मंजूरी मिळाली आहे.
क्राफ्टनची योजना या आयपीओद्वारे आपले व्हॅल्यूएशन 25 बिलियन डॉलर म्हणजे 88,000 कोटी रुपये करण्याची आहे.
या आयपीओसाठी IPO शेयरची इश्यू प्राईस काय असेल आणि किती शेयर ऑफर केले जातील, याचा निर्णय अजून झालेला नाही.

ब्लॅक फंगसचे औषध टॅक्स फ्री, कोरोना व्हॅक्सीनवर 5% GST कायम; ऑक्सीजन सुद्धा स्वस्त

मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारताने PUBG Mobile India ला बॅन केल्यानंतर क्राफ्टनने चीनच्या China टेंन्सेट गेम्समधून भारतात गेमचे पब्लिशिंग आणि डिस्ट्रिब्यूशन राईट्स परत घेतले होते.
मात्र, कंपनी अजूनही इतर देशात पब्लिशर आणि डिस्ट्रिब्यूटर आहे.

पुढील वर्षी कंपनीचा Survival Horror गेम लाँच होऊ शकतो.
तसेच PUBG मोबाइल इंडियाचे नवे रूप बॅटलग्राऊंड्स मोबाइल इंडिया लवकरत भारतात लाँच होऊ शकते.
कंपनीने आपल्या ऑफिशियल फेसबुक पेजवर ही माहिती दिली आहे.
जाणकारांचे म्हणणे आहे की, कंपनी बॅटल royale-style अ‍ॅक्शन टायटल सप्टेंबरमध्ये भारतात लाँच करू शकते.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :  pubji game maker crafton set to launch 5 billion dollars ipo next week business news

हे देखील वाचा

Pune News | नवले ब्रिजजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत 43 वर्षीय सिव्हिल इंजिनिअर सरदेशपांडे यांचा मृत्यू

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी-चिंचवड शहरात आज 442 जण ‘कोरोना’मुक्त, 240 नवीन रुग्णांची नोंद

Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 459 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा