Pune ACB Demand Trap Case | सातबारा नोंदीसाठी लाच मागणाऱ्या मध्यस्थावर पुणे एसीबीकडून गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Demand Trap Case | सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी शेतकऱ्याकडे 80 हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी एका खासगी व्यक्तवर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीने थेऊरच्या तत्कालीन मंडल अधिकारी जयश्री कवडे (Jayshree Kawade) यांच्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. शेतजमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी थेऊरमधील मंडल अधिकारी जयश्री कवडे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. (Pune Bribe Case)

पुणे एसीबीकडे प्राप्त झालेल्या तक्ररीपैकी एका तक्रारीत दहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कवडे यांच्यासह तिघांना पकडण्यात आले आहे. तर दुसऱ्या प्रकरणात सापळा कारवाई करण्यात आली नाही. परंतु कवडे यांच्यासाठी 80 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मध्यस्थावर गुन्हा दाखल केला आहे.(Pune ACB Demand Trap Case)

शेतजमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी मंडल अधिकारी जयश्री कवडे, खासगी संगणक ऑपरेटर योगेश कांताराम तातळे Yogesh Kantaram Tatle (रा. दिघी), एजंट विजय सुदाम नाईकनवरे Vijay Sudam Naiknaware (वय-38 रा. नागपुर चाळ, येरवडा) यांच्यावर लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 25 वर्षीय तरुणाने पुणे एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १२ मार्च रोजी सापळा लावून थेऊर मंडल अधिकारी कार्यालयात लाच घेताना पकडले.

दुसऱ्या प्रकरणात 65 वर्षीय शेतकऱ्याने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांनी हवेली तालुक्यतील कोलवडी येथे जमीन खरेदी केली होती. त्या जमीनीची सातबारा उताऱ्यावर नोंद, तसेच फेरफार मंजूर करण्यासाठी थेऊर मंडल अधिकारी कवडे यांच्याकडे अर्ज केला होता. विजय नाईकनवरे याने तक्रारदारांकडे 80 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्याची पडताळणी 15 आणि 28 फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. यामध्ये विजय नाईकनवरे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मात्र, या तक्रारीत प्रत्यक्ष सापळा कारवाई पूर्ण होण्यापूर्वीच दुसऱ्या तक्रारीत विजय नाईकनवरे याच्यासह मंडल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (Amol Tambe SP), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे एसीबी पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे (PI Shreeram Shinde) करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Andolak-Ashok Chavan | संतप्त मराठा बांधवांनी अशोक चव्हाणांची गाडी आडवली, जोरदार घोषणाबाजी, अखेर माघारी फिरले

Police Inspector Arrested In Robbery Case | व्यावसायिकाचे दोन कोटी लुटल्याच्या प्रकरणात पोलीस निरीक्षकाला अटक, पोलीस दलात प्रचंड खळबळ