Pune Accident News | पुणे : नवीन कारचा आनंद काही वेळच टिकला! अष्टविनायक महामार्गावर झालेल्या अपघातात 3 तरुणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | मित्राने नवीन कार घेतल्याने सात मित्र दोन कारमधून देवदर्शन करण्यासाठी जात होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्या कंटेनरची एका कारला धडक बसली. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा भीषण अपघात रविवारी (दि.28) संध्याकाळी थेऊर या अष्टविनायक मार्गावरील जोगेश्वरी मंदिरासमोर झाला.(Pune Accident News)

गणेश जाधव (वय-32), विनोद भोजणे (वय-36), विठ्ठल जोगदंड (वय-36 तिघे रा. शिक्रापूर) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी कंटेनर चालकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूरमध्ये राहणाऱ्या तरुणाने नवीन कार खरेदी केली होती. ही कार घेऊन सात जण दोन कारमधून थेऊर येथे देवदर्शनासाठी गेले होते. चार तरुण दुसऱ्या कारमध्ये होते. यातल्या दुसऱ्या कारचा भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या कारला जोरात धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला.

अपघाताची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक गुन्हे सीमा ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, वैद्यनाथ केदार, प्रदीप भुजबळ, विशाल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या तरुणांना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना तिघांचा मृत्यू झाला.

टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

पुणे : कोल्हापूरला जाण्यासाठी दोन मुलांसह बसची वाट पाहत थांबलेल्या महिलेला आयशर टेम्पोने धडक दिली.
यामध्ये गंभीर जखमी झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. तर लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
हा अपघात शनिवारी (दि.27) रात्री साडे अकराच्या सुमारास नऱ्हे येथील भुमकर ब्रीज जवळील कात्रज-देहूरोड
बाह्यवळण मार्गावरील सातारा लेनवर झाला.

शितल सिद्धराम पाटील (वय-42 रा. खेडेकर इंडस्ट्री, नऱ्हे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी रोहन सिद्धराम पाटील (वय-19) याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तर फिर्यादी यांची भाची अबोली सुरज शेटके (वय-6) जखमी झाली आहे.
पोलिसांनी आयशर टेम्पो (एमएच 14 एल.बी.8565) चालक पांडुरंग सुनिल पिनाटे
(वय-28 रा. तुगाव ता. भालकी, जि. बिदर, कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe – Shivajirao Adhalrao Patil | निवडणूक प्रचारात कोल्हे-आढळराव आमनेसामने ! हरिनाम सप्ताहात आढळरावांनी ऐकलं डॉ. कोल्हेंच संपुर्ण भाषण

Murlidhar Mohol | पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभेपूर्वी मुरलीधर मोहोळ म्हणाले, येत्या काळातदेखील पुण्याच्या विकासासाठी…