Pune Cheating Fraud Case | बनावट सह्यांच्या आधारे भागीदाराकडून सव्वापाच कोटींची फसवणूक ! न्यायालयाने जामीन फेटाळूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा पीडित माणिक बिर्ला यांचा पत्रकार परिषदेत आरोप

पुणे : Pune Cheating Fraud Case | शहरातील बिर्ला-कोटबागी प्रमोटर्स अँड बिल्डर्स (Birla Kotbagi Promoters and Builders) या फर्मच्या माध्यमातून महेश श्रीपाद कोटबागी (Mahesh Shripad Kotbagi) यांनी मयत आणि हयात भागीदाराच्या नावाने खोट्या सह्या करून सुमारे सव्वापाच कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने महेश कोटबागी यांचा जमीन फेटाळत अटक करण्याचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत. मात्र, पोलिसांकडून कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप पीडित माणिक बिर्ला यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी सार्थक बिर्ला, ॲड. विनयकुमार वाजपेयी उपस्थित होते.(Pune Cheating Fraud Case)

माणिक बिर्ला म्हणाले, “मी व्यावसायिक असून माझे दिवंगत वडील रामचंद्र बिर्ला यांची आर. एस. बिर्ला प्रमोटर्स अँड बिल्डर्स या नावाने कन्स्ट्रक्शन फर्म होती. तसेच त्यांची बिर्ला-गोरे असोसिएट्स ही सुद्धा फर्म होती. माझे वडीलांची डॉ. महेश कोटबागी यांचेशी ओळख होती. डॉ. कोटबागी यांची आत्या सुमती सुभेदार यांचे नावे असलेला ५६९ चौ. मी. प्लॉट, स. नं. १९, हिस्सा नंबर १३/८ बी पैकी प्लॉट नंबर ६९, सीटी सर्व्ह नंबर २८६/१, हिंगणे बु. कर्वेनगर, पुणे येथे प्लॉट होता. या प्लॉटशेजारीच ५०० चौ. मी. चा प्लॉट माझ्या नावावर असल्याने डॉ. महेश कोटबागी हे माझ्या वडीलांना भेटण्याकरीता आले व त्यांनी दोन्ही प्लॉटवर एकत्र येवून स्किम करणेबाबत विचारले. माझ्या वडीलांनी त्यास संमती दिली.(Pune Cheating Fraud Case)

मी व सुमती सुभेदार असे दोघांनी मिळून सदरचा प्लॉट विकसित करण्याकरीता माझे वडील रामचंद्र बिर्ला व
डॉ. महेश कोटबागी यांना परवानगी दिली. त्यांनी त्यांची बिर्ला-कोटबागी प्रमोटर्स अँड बिल्डर्स या नावाने फर्म स्थापित केली. त्या फर्म व आमच्यामध्ये दस्त क्रमांक ३६५७/२००३ अन्वये दि. २३/०७/२००३ मध्ये डेव्हलपमेंट अग्रीमेंट झाले. त्यानुसार बिर्ला-कोटबागी प्रमोटर्स अँड बिल्डर्स हे आमचा प्लॉट विकसित करून देणार होते. त्याबदल्यात ते मला आणि सुमती सुभेदार असे दोघांनाही ८८० चौ. फु. व ९० चौ. फुटाचा टेरेस फ्लॅट देणार, असा व्यवहार ठरला होता. सदर फ्लॅटऐवजी मी नंतर चार दुकाने घेवून सदरचा फ्लॅट हा सुमती सुभेदार यांना दिलेला आहे.

तसेच दि. ०२/०७/२००३ मध्ये ५१७७/२००३ अन्वये माझे वडील रामचंद्र बिर्ला व डॉ. महेश कोटबागी यांचेमध्ये भागीदारी करारनामा झालेला आहे.
सन २००३ पासून सदर विकसित करण्याचे काम चालु होते.
सदर जागेवर श्रीराम अपार्टमेंट करणार असून, त्यामध्ये एक इमारत उभी राहणार होती.
त्यामध्ये १७ फ्लॅट, १३ दुकाने व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना द्यावयाचे ११ फ्लॅट अशी मंजूरी होती.
आम्ही ३६५८/२००३ व ३६५९/२००३ अन्वये दोन दस्ताव्दारे बिर्ला-कोटबागी प्रमोटर्स अँड बिल्डर्सला कुलमुखत्यारपत्र
केलेले आहे. तसेच सदर फर्मकरीता जनसेवा बैंक शाखा वारजे, पुणे येथे ऑगस्ट २००४ मध्ये आणि आयडीबीआय बँक,
औंध शाखा पुणे येथे डिसेंबर २०१० मध्ये खाते सुरू केले.”

दि. १३/०४/२००७ रोजी माझे वडील रामचंद्र बिर्ला यांचे निधन झाले. त्यानंतर भागीदारी करारनाम्याप्रमाणे वारस म्हणून
मी भागीदार झालो.
त्यानंतर शेजारील आणखी एक ७३८ चौ. मी. प्लॉट, सीटीएस नंबर २८६ (बी विंग) घेऊन दुसऱ्या विंगचे काम सन २०११ मध्ये सुरू करण्यात आले.
तेव्हा १०/०५/२०११ रोजी दस्त नंबर ४२२७/२०११ पॉवर ऑफ ऍटर्नी फार्मतर्फे संगीता अप्पासाहेब कलमानी यांना ७३८ चौ. मी करीता दिली होती.
२०१३ मध्ये पहिल्या इमारतीचे काम पूर्ण होवून ताबा देण्याचे काम चालु होते. तर सन २०१७ मध्ये दुसरी इमारत पुर्ण होवून ताबा देण्याचे काम चालु होते.

सन २०१७ मध्ये फर्मच्या असलेल्या बँक खात्याबाबत मला शंका आल्याने मी बँक खात्याची तपासणी केल्यावर त्यात गडबड दिसून आली. कर्वेनगर येथील १०६९ चौमी या जागेवर, बांधण्यात आलेल्या श्रीराम अपार्टमेंट, ए विंग व बी विंग मधील फ्लॅट धारकांच्या करण्यात आलेल्या काही अँग्रीमेंट टु सेल, सेल डीड, डिड ऑफ अपार्टमेंट, डिक्लरेशन डिड व हमीपत्र यावर माझ्या बनावट सह्या व अंगठा तसेच मनपाच्या पुनर्बांधणी प्लॅनवर सन २०१० मध्ये माझे वडील आर. एस. बिर्ला हे मयत झालेले असतानादेखील त्यांच्या सह्या केल्या. तसेच बिर्ला-कोटबागी या फर्मच्या जनसेवा सहकारी बँक, शाखा वारजे आणि आयडीबीआय बँक औंध या खात्यांमध्ये अफरातफर करून माझी फसवणुक केली आहे.

कोर्टात गुन्हेगारी कृत्य स्पष्ट

याबाबत न्यायालयात दाद मागण्यात आली असता, न्यायालयाच्या निदर्शनास आले की, सुमती सुभेदार यांना जागेच्या बदल्यात एक कोटी १० लाख रुपये देणे असताना त्यांना करारापेक्षा अधिकचे दोन कोटी ५३ लाख जादा रक्कम परस्पर दिली गेली आहे. तसेच करारनामापेक्षा सुभेदार यांच्या नंतरच्या काळात करण्यात आलेल्या सह्या या वेगळ्या आहेत. रामचंद्र बिर्ला हे २००७ मध्ये मयत झाले असतानाही ०३/११/२०१० रोजी प्लॅनवर त्यांची बनावट सही करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे माणिक बिर्ला यांच्या देखील बनावट सही करण्यात आले आहे. हा गंभीर गुन्हा असून आर्थिक फसवणुकीच्या या गुन्ह्यात मुळापर्यंत तपास करणे आवश्यक आहे. आरोपीच्या पोलीस कोठडी शिवाय ही चौकशी शक्य होणार नाही, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने आपल्या निकालात दिले आहेत. मात्र, त्यानंतर देखील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस आरोपीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करून न्यायालयाचा अवमान करत आहेत.

पोलिसांकडून टाळाटाळ

२० डिसेंबर २०२३ एफआयआर होऊन दोन महिने झाले तरी त्यावर कारवाई झाली नव्हते.
त्यानंतर २१ फेब्रुवारी २०२४ ला अटकपूर्व जमीन फेटाळला असून, पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत.
तरी पोलिसांनी अजून बोलावलेले नाही. कोटबागी यांच्यासमवेत अन्य २२ लोक सहभागी आहेत.
मात्र, त्यांनाही चौकशीसाठी बोलावलेले नाही. गुन्हा दाखल होऊनही कोटबागी बिनधास्तपणे सर्वत्र फिरत आहे.
सोशल मीडियावर सक्रिय आहे. असे असूनही आरोपी मोकाट फिरतोय व पीडित पोलिसांचे उंबरे झिजवत आहेत,
अशी ही परिस्थिती आहे. तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन योग्य तो तपास व कारवाई करावी,
अशी आमची मागणी आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pramod Nana Bhangire | ‘अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना निधी न आणणाऱ्या विरोधकांनी श्रेय लाटू नये’ ! ‘विकास कामात अडथळा आणल्यास करारा जवाब मिलेगा’ – प्रमोद नाना भानगिरे