Pune Cheating Fraud Case | पुणे : फ्लॅट देण्याच्या बहाण्याने एक कोटींची फसवणूक, बिल्डर सह चार जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cheating Fraud Case | फ्लॅट देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची एक कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बिल्डर असलेल्या चुलत भावासह चार जणांवर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बोपोडी येथील कॅस्टल रॉयल टॉवर येथे सप्टेंबर 2021 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत घडला आहे.(Pune Cheating Fraud Case)

याबाबत गौरव दिलीप आगरवाल (वय-40 रा. बी. 1, कॅस्टल रॉयल टॉवर नंबर 2. रेंजहिल्स जवळ, बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन फिर्यादी यांचा चुलत भाऊ बिल्डर संतोष अशोक आगरवाल, त्याची पत्नी निधी संतोष आगरवाल, फिर्यादी यांचा साडु आलोक मनोहर तायल व त्याची पत्नी पुजा आलोक तायल यांच्यावर आयपीसी 420, 406, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष आगरवाल हा फिर्यादी यांचा चुलत भाऊ आहे.
संतोष आगरवाल याने कस्तुरी एपीटमी या बांधकाम योजनेतील डी बिल्डींगमधील 12 व्या मजल्यावरील फ्लॅट
फिर्यादी गौरव यांना 1 कोटी 40 लाखांना देण्याचे मान्य केले. त्यापैकी एक कोटी रुपये देऊन उर्वरित 50 लाख रुपये
फ्लॅटचा ताबा घेताना देण्याचे ठरले होते. त्यानुसार गौरव आगरवाल यांनी संतोष आगरवाल याला एक कोटी रुपये दिले. तसेच पैसे मिळाल्याची पोहोच पावती संतोष याने फिर्यादी यांना दिली.

इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संतोष आगरवाल याने फिर्य़ादी यांना फ्लॅट दिला नाही.
त्याने हा प्लॅट फिर्य़ादी यांचा साडू आलोक तायल याला परस्पर विकून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गौरव आगरवाल यांनी खडकी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला.
या अर्जाची चौकशी करुन खडकी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shiv Sena MLA Disqualification Case | आज आमदार अपात्रतेचा निकाल; ऐतिहासिक निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष; वर्षावर तातडीची बैठक

नशा करण्यासाठी बेकायदेशीर इंजेक्शनची विक्री, हडपसर पोलिसांकडून एकाला अटक

दारूच्या नशेत नेहमीच शिवीगाळ करणाऱ्या मित्राचा खुन, आरोपीला कोंढवा पोलिसांकडून 8 तासात अटक

मैत्रिणीनेच मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची केली मागणी, पुण्यातील धक्कादायक प्रकार