Pune Crime | गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून 12 लाखांची फसवणुक; सांगलीच्या मिलिंद गाढवे आणि निगडीतील अजय इंगळेवर FIR

पुणे : Pune Crime | गुंतवणुकीवर दरमहा ६ ते ८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून बनावट ट्रेडिंग अ‍ॅपद्वारे (Fake Trading App) ११ लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी विमाननगर येथील एका ५५ वर्षाच्या नागरिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station ) फिर्याद (गु. रजि. नं. ४१६/२२) दिली आहे. त्यानुसार मिलिंद बाळासाहेब गाढवे Milind Balasaheb Gadhave (रा. सांगली) आणि अजय जगदेव इंगळे Ajay Jagdev Ingle (रा. निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेबर २०२१ ते १० जानेवारी २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांच्या सोबत ओळख करुन घेऊन
विश्वास संपादन केला. त्यांनी गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर दर महा ६ ते ८ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले.
त्यांना एस एम ग्लोबल कंपनीचे मेटा ट्रेंडर हे फॉरेक्स ट्रेडिंग या बनावट ट्रेडिंग अ‍ॅपद्वारे ११ लाख ६२ हजार १८५ रुपये
घेतले. त्याचा अ‍ॅक्सेस स्वत:कडे ठेवला. फिर्यादी यांना कोणताही परतावा न देता यांची फसवणूक
(Cheating Case) केली. सहायक पोलीस निरीक्षक पाठक (Assistant Police Inspector Pathak) तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | 12 lakh fraud with the lure of high return on investment; FIR against Milind Gadve of Sangli and Ajay Ingle of Nigdi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aishwarya Rai | करीनाच्या कृपेनेच ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमानची एन्ट्री…

Balasaheb Thorat | काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे सहभागी होणार?, बाळासाहेब थोरात म्हणाले…