Pune Crime | प्रेमप्रकरणातून भरदिवसा महाविद्यालयीन तरुणीचा चाकूने सपासप वार करुन खून, औंध परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | प्रेमप्रकरणातून (Love Affair) महाविद्यालयीन तरुणीचा भरदिवसा चाकूने सपासप वार करुन खून (College Girl Murder) केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना (Pune Crime) बुधवारी (दि.9) दुपारी औंध परिसरात (Aundh) घडली आहे. घटनेनंतर आरोपी पळून गेला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत

श्वेता रानवडे Shweta Ranwade(वय-22 रा. औंध) असे खून झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचे नाव आहे. श्वेताचे नात्यातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघेजण लग्न करणार होते. परंतु तरुणाची वर्तणुक योग्य नसल्याने तिने त्याच्यासोबत असलेले संबंध तोडले होते. त्यामुळे आरोपी तरुण तिच्यावर चिडला होता. बुधवारी दुपारी श्वेता औंध जकात नाका (Aundh Jakat Naka) परिसरातून घरी जात होती. त्यावेळी आरोपीने तिला आडवले.(Pune Crime)

आरोपी तरुणाने सोबत आणलेल्या चाकूने श्वेताच्या गळ्यावर सपासप वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली.
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेला. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे
(Chaturshringi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे
(Senior Police Inspector Rajkumar Waghchaure) आणि तपास पथकाचे पोलीस घटनास्थळी
दाखल झाले. पळून गेलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे.
पुढील तपास चतु:शृंगी पोलीस करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | A college girl was stabbed to death in broad daylight due to a love affair, an incident in Aundh area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | संजय राऊत यांना केलेली अटक बेकायदेशीर – विशेष सत्र न्यायालयाने ईडीला फटकारले

Pune Crime | निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) मुलाचे धक्कादायक कृत्य, तरुणीचे न्यूड फोटो पॉर्नसाईटवर केले अपलोड