Pune Crime | पुणे स्टेशनला जाण्यास नकार देणार्‍या कॅबचालकावर चाकू हल्ला करणार्‍याने पोलिसांना केले जखमी

पुणे : Pune Crime | बाणेर (Baner) येथून पुणे स्टेशन (Pune Station) येथे जाण्यास नकार देणार्‍या कॅबचालकाच्या (Cab Driver) पोटात चाकूने वार (Knife Attack) करणार्‍या हल्लेखोराने पोलिसांनाही मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chatushrungi Police) अभिनव शैलेंद्रकुमार सिंग (Abhinav Shailendra Kumar Singh) (वय २७, रा. मेगापोलीस, सांग्रिया, हिंजवडी) याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार संदीप बर्गे (Police Constable Sandeep Burge) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chatushrungi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४०७/२२) दिली आहे. हा प्रकार बाणेर रोडवरील (Baner road) डी मार्टचे (D Mart Pune) पॅकिंगमध्ये मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅबचालक शिवराज जटाळे (Cab Driver Shivraj Jatale) याने पुणे स्टेशन येथे येण्यास नकार दिला.
त्यावेळी झालेल्या वादात अभिनव सिंग याने कॅबचालक शिवराज जटाळे याच्या पोटात चाकू खुपसून त्याला जखमी केले. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली.
त्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गाडेकर (Police Sub-Inspector Gadekar), संदीप बर्गे (Sandeep Berge) हे घटनास्थळी पोहचले.
आरोपीला ताब्यात घेत असताना त्याने बर्गे यांच्या डोक्यात लाकडी दांडके मारुन जखमी केले.
तसेच गाडेकर यांना ढकलून दिले.
पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक माळेगावे (API Malegave)  तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | A knife attack on a cab driver who refused to go to Pune station injured the police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | टोळक्याने दुकानात घुसून तोडफोड करीत पसरविली दहशत; वाकड येथील भूमकर चौकात घातला राडा

T-20 World Cup | T-20 वर्ल्डकप आधी ICC ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, 1 ऑक्टोबरपासून होणार लागू