Pune Crime | बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी SRPF जवानाला जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | फेसबुक (Facebook) फ्रेंडने एका 24 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) उघडकीस आली होती. या प्रकरणातील आरोपी एसआरपीएफ (SRPF) जवान रोहित रोहिदास भुजबळ Rohit Rohidas Bhujbal (वय-26 रा. काळे पडळ, हडपसर) याला पोलिसांनी अटक केली होती. आरोपीने न्यायालयात जामिनासाठी वकिलांमार्फत अर्ज केला होता. न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर (Bail application approved) केल्याची माहिती आरोपीचे वकील अ‍ॅड. प्रसाद निकम (Adv. Prasad Nikam) यांनी दिली.

तरुणीने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते की, आरोपी रोहित भुजबळ याची फेब्रुवारी 2019 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती.
आरोपीने आधी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट (Friend Request) पाठवली आणि ओळख केली.
त्यानंतर तिला प्रपोज करुन 2019 ते 2021 या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार (Pune Crime) केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन आरोपीला 12 ऑगस्ट रोजी अटक केली. या प्रकरणात आरोपीने जामीन मिळावा यासाठी अ‍ॅड. प्रसाद निकम, अ‍ॅड. तन्मय देव
(Adv.Tanmay Deo), अ‍ॅड. मन्सूर तांबोळी (Adv.Mansoor Tamboli), अ‍ॅड. सिद्धर्थ चव्हाण (Adv.Siddharth Chavan) आणि अ‍ॅड. कोमल अंगारखे ( Adv.Komal Angarkhe) यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला होता.

 

आरोपीच्या वकिलांनी संबंधित तरुणीकडून आरोपीची फसवणूक झाली आहे. फिर्यादी महिला ही विवाहीत असताना घटस्फोट झाला असल्याचे आरोपीला सांगून त्याची फसवणूक केली, असा युक्तीवाद न्यायालयात केला.
आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.ए. पत्रावले (Additional Sessions Judge V.A. Patravale) यांनी जामीन मंजूर केला.
न्यायालाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपीला जामीन मंजूर केला आहे. तसेच प्रत्येक सोमवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.
याशिवाय तपासात पोलिसांना सहकार्य करण्यास सांगितले आहे.

 

Web Title : Pune Crime | Bail granted to SRPF jawan accused of rape

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत ब्लेडने केले वार, 7 जणांवर FIR

Cooperative Society Elections | राज्यातील साडेचौदा हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार; पुण्यातील हजार संस्थांचा समावेश

Anil Deshmukh | 100 कोटींचे कथित वसुली प्रकरणी आता ‘त्या’ 2 बडया व्यक्तींना सीबीआयचे ‘समन्स’