Pune Crime Court News | पुणे : लाच प्रकरणातील महिला पोलीस उपनिरीक्षक निर्दोष मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime Court News | अटक न करण्याची भिती घालून अटक टाळण्यासाठी 40 हजार रुपये लाच स्वीकारल्या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील (Warje Malwadi Police Station) तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक सपना विजयकुमार सोळंके (PSI Sapna Vijaykumar Solanke) यांची विशेष न्यायाधीश एस.जी. वेदपाठक (Judge SG Vedpathak) यांनी निर्दोष मुक्तता केली.(Pune Crime Court News)

आरोपी पोलीस उपनिरीक्षक सपना सोळंके (PSI Sapna Solanke) यांनी तक्रारदार महिले विरुद्ध तक्रारी अर्ज नसतानाही तसे खोटे सांगितले. तसेच अटक करण्याची भिती घालून 37 हजार रुपयांची मागणी करुन 6 डिसेंबर 2017 रोजी वारजे माळवाडी पोलीस चौकीत लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते.

लाच प्रकरणात सरकार पक्षाने तीन साक्षीदार तपासले. आरोपीच्या वतीने अॅड. प्रताप परदेशी (Adv Pratap Pardeshi)
यांनी कामकाज पाहिले. आरोपी विरुद्ध कोणताही सबळ पुरवा हा पटलावर आला नाही. फिर्यादी व पंच यांच्या साक्षीमध्ये
विसंगती आढळून आल्याने आरोपीने लाचेची रक्कम स्वीकारल्याचे कोठेही निष्पन्न झाले नाही.

आरोपीच्या वकीलांनी केलेली उलटतपासणी आणि युक्तीवाद ग्राह्य धरुन विशेष न्यायाधीश एस.जी. वेदपाठक यांनी
सबळ पुराव्या अभावी आरोपी महिला पोलीस उपनिरीक्षक सपना सोळंके यांची निर्दोष मुक्तता केली.
आरोपीच्या वतीने अॅड. प्रताप परदेशी यांच्यासह अॅड. प्रमोद धुळे आणि अॅड. महेश राजगुरु यांनी कामकाज पाहिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitin Gadkari Sabha In Pune | नितीन गडकरी मांडणार पुण्याच्या विकासाचा रोडमॅप, कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन

Murlidhar Mohol | मुळा-मुठा होणार सुंदर आणि प्रदूषणमुक्त – मुरलीधर मोहोळ