Pune Crime | कोथरूडमधील येनपुरे टोळीवर दुहेरी ‘मोक्का’; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 105 वी ‘मोक्का’ कारवाई

पुणे – Pune Crime | कोथरूड (Kothrud) परिसरात दहशत माजविणार्‍या सराईत टोळीप्रमुख सागर येनपुरे (Gangster Sagar Yenpure) याच्याविरूद्ध दुहेरी मोक्का MCOCA (Mokka) कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय साथीदारांच्या विरोधात ‘मोक्का’नुसार कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी ‘मोक्का’नुसार केलेली ही १०५ वी कारवाई आहे. मागील १० महिन्यांत तब्बल ४२ टोळ्यांविरुद्ध ‘मोक्का’ कारवाईने सराईतांचे कंबरडे मोडले आहे. (Pune Crime)

टोळीप्रमुख सागर उर्फ मांडी तानाजी येनपुरे (२९), साहिल विनायक जगताप (२५) वैभव प्रदीप जगताप (सर्व रा. केळेवाडी, कोथरूड) अशी दुहेरी ‘मोक्का’ कारवाई केलेल्यांची नावे आहेत. तर साथीदार साहिल रवींद्र कंधारे (२२), जितेश उर्फ पिल्या संतोष खेडेकर (२०), अक्षय दामू वाळुंज, सुरेश कालिदास वाजे यांच्याविरूद्ध एका गुन्ह्यात मोक्का कारवाई केली आहे. (Pune Crime)

सराईत सागर येनपुरे टोळीने पौड रस्त्यावरील केळेवाडी परिसरात (Paud Phata, Kelewadi, Kothrud, Pune, Maharashtra) दहशत माजविली होती. त्यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दहशत माजविणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी टोळीविरुद्ध ‘मोक्का’ कारवाईचा प्रस्ताव कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप (Senior Police Inspector Mahendra Jagtap) यांनी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad) यांच्यावतीने अपर आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांना पाठविला. पोलीस आयुुक्त अमिताभ गुप्ता यांनी टोळीविरोधात ‘मोक्का’ कारवाई केली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे (ACP Rukmini Galande) करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta), सहआयुक्त संदीप कर्णिक (IPS Amitabh Gupta), अपर आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे (Police Inspector Balasaheb Bade), पोलीस उपनिरीक्षक तानाजी पांढरे (PSI Tanaji Pandhre), उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी (PSI Pravin Kulkarni), अजय सावंत, अनिल बारड यांनी केली.

मागील दहा महिन्यातील ४२ वी ‘मोक्का’ कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आतापर्यंत १०५ टोळ्यांतील ७२४ सराईतांविरुद्ध ‘मोक्का’नुसार कारवाई केली आहे.
मागील १० महिन्यांत ४२ टोळ्याविरुद्ध ‘मोक्का’ कारवाई केल्यामुळे गुंडांचे धाबे दणाणले आहे.
त्याशिवाय भाईगिरी-दादागिरी करणाNया ८२ गुंडांविरुद्ध ‘एमपीडीए’नुसार कारवाई करून राज्यातील विविध कारागृहांत स्थानबद्ध केले आहे.

Web Title :-  Pune Crime | Double MCOCA Mokka On Sagar Yenpure Gang Of Kothrud Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cyber Crime | सायबर चोरट्याकडून महिलेला साडेसहा लाखांचा गंडा; परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष

Ramdas Athawale | रामदास आठवलेंनी घेतली राज्यपालांची भेट