Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नागपूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्ता यांच्याकडून प्रभावीपणे Action

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | समर्थ पोलीस ठाण्याच्या (Samarth Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा अट्टल गुन्हेगार फिरोज उर्फ बबाली मकबुल खान याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आजपर्यंत तब्बल 75 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार फिरोज उर्फ बबाली मकबुल खान Feroze alias Babali Maqbul Khan (वय- 49 रा. आयना मस्जिद समोर, भवानी पेठ, पुणे) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे (Criminal) नाव आहेत. बबाली खान याला एमपीडीए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे. (Pune Crime)

बबाली खान हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह समर्थ, खडक (Khadak Police
Station) व कोंढवा पोलीस स्टेशनच्या (Kondhwa Police Station) हद्दीमध्ये कोयता, सुरा, चाकू, तलवार
यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), जबरी चोरी, घातक शस्त्रासह
गंभीर दुखापत करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत.
मागील पाच वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध 9 गंभीर गुन्हे (FIR) दाखल आहेत.

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बबाली खान याच्यावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे (Senior Police Inspector Ramesh Sathe),
पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali
Chandgude) यांनी ही कामगिरी केली.

Web Title :- Pune Crime | Inveterate criminal from Pune lodged in Nagpur Jail for one year, effective action by CP Amitabh Gupta under MPDA Act

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis| ‘बापाच्या जीवावर जगणाऱ्यानी स्वयंभू नेते असलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्या आधी आपली लायकी तपासावी’

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना या महिन्यात मिळू शकते DA वाढीची भेट, असे करा कॅलक्युलेट