Pune Crime | मसाज करुन घेणे पडले महागात, नजर चुकवून मंगळसुत्र केले लंपास; लोणीकंद पोलीस ठाण्यात FIR

पुणे : Pune Crime | घरी कोणी आले व मसाज करतो, असे सांगितले तर सावधान. ज्येष्ठ महिलेला चांगला मसाज करतो, असे सांगून गळ्यातील मंगळसुत्र बाजूला काढून ठेवण्यास सांगून चोरटे ते चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी आव्हाळवाडी येथील एका तरुणाने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६२३/२२) दिली आहे. ही घटना आव्हाळवाडीत सोमवारी सकाळी साडेआठ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई घरी असताना चोरट्याने त्यांचा विश्वास संपादन केला.
मी चांगला मसाज करतो, असे सांगितले. फिर्यादी यांचे आईने गळ्यातील अडीच तोळ्याचे ७० हजार रुपयांचे मंगळसुत्र मसाज करताना बाजूला ठेवले होते. नजर चुकवून चोरट्याने ते चोरुन नेले. पोलीस उपनिरीक्षक कोळपे (Sub-Inspector of Police Kolpe) तपास करीत आहेत.

Web Title :-Pune Crime | It was expensive to get a massage; FIR in Lonikand Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update