Pune Crime News | शहरात दहशत पसरवणाऱ्या संदीप शेंडकर व त्याच्या 6 साथीदारांवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 21 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | रंगपंचमी खेळणाऱ्या तीन तरुणांवर पूर्ववैमनस्यातून वार करुन दगड व विटांनी मारुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील सरईत गुन्हेगार संदीप सोमनाथ शेंडकर व त्याच्या इतर सहा साथीदारांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी मोक्का कारवाई (MCOCA) Mokka केली आहे. पोलीस आयुक्तांनी आजपर्यंत 21 टोळ्यांवर (Pune Crime News) कारवाई केली आहे.

टोळी प्रमुख संदीप सोमनाथ शेंडकर (वय-23), ऋषी शिवाजी भगत (वय-29), सुफियान बशिर शेख (वय-19), अल्ताफ सलिम शेख (वय-19 सर्व रा. बालाजीनगर, धनकवडी) यांच्यासह इतर दोन व एका अल्पवयीन मुलावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. आरोपींनी तीन जणांवर लोखंडी हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले. यावेळी तरुणांना सोडवण्यासाठी आलेल्या नागरिकांवर हातातील हत्यारे उगारून धमकी दिली. यानंतर आरोपींनी हत्यारे हवेत फिरवत आरडाओरडा करुन परिसरात दहशत निर्माण केली. याबाबत आरोपींवर सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) आयपीसी 307, 324, 323, 506, 143, 147, 148, 149, महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), आर्म अॅक्ट (Arm Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

टोळी प्रमुख संदीप शेंडकर याने साथीदारांच्या मदतीने सहकारनगर, भारती विद्यापीठ (Bharati Vidhyapeeth Police Station), कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, लोकावर हल्ले, विना परवाना शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र, त्यांच्यात काहीच सुधारणा झाली नाही. त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

या टोळीवर सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का कलमाचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर (Senior PI Savalaram Salgaonkar) यांनी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांच्याकडे सादर केला होता. अपर पोलीस आयुक्तांनी या प्रस्तावाची पडताळणी केली. त्यानंतर आरोपींवर मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगांवकर (ACP Narayan Shirgaonkar)करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे (API Sameer Shende),
पोलीस उपनिरीक्षक मुलाणी व पोलीस अंमलदार यांनी केली.

Web Title :-  Pune Crime News | 21st MCOCA Mokka action by Police Commissioner Ritesh Kumar on pune criminals
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | ठाण्यातील प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात; म्हणाले – ‘फडणवीस फडतूस, गृहमंत्री नव्हे तर हे तर गुंडमंत्री’ (व्हडिओ)

Roshni Shinde | ‘गुंडगिरी करण्यासाठी मुख्यमंत्री झालात का?’, मारहाण झालेल्या रोशनी शिंदेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Sinhagad Fort-Regional Tourism Scheme | प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सिंहगड परिसर संवर्धनासाठी 3 कोटी 75 लाख मंजूर